शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्याची पोलीस भरती रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 23:47 IST

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : संपूर्ण राज्यात मार्च २०१८ मध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात असताना, सांगलीची पोलीस भरती यावर्षी रद्द करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस दलात केवळ २६ जागा रिक्त असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या २६ जागा व यावर्षी होणाºया रिक्त जागा मिळून पुढील वर्षी भरती ...

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : संपूर्ण राज्यात मार्च २०१८ मध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात असताना, सांगलीची पोलीस भरती यावर्षी रद्द करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस दलात केवळ २६ जागा रिक्त असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या २६ जागा व यावर्षी होणाºया रिक्त जागा मिळून पुढील वर्षी भरती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.राज्यात प्रत्येक वर्षी जिल्हानिहाय पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जाते. वशिलेबाजीला कोणताही थारा दिला जात नाही. गुणवत्तेच्या जोरावर तरुण-तरुणी पोलीस भरतीसाठी उतरतात. गेल्या काही वर्षांत बेरोजगारांची संख्या वाढल्याने पोलीस भरतीसाठी हजारो तरुण-तरुणी उतरत आहेत; पण जेवढ्या जागा रिक्त आहेत, तेवढ्याच जागांसाठी भरती केली जाते. विशेषत: वर्षभरात किती पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झाले, हे पाहून जागेचा निकष लावला जातो; परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात भरतीला प्राधान्य दिले जात नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रत्येकवर्षी जागा वाढवून मागतात. मात्र, गृह विभागाकडून त्याला मंजुरी मिळत नाही. याचा परिणाम दैनंदिन कामावर होत आहे.सांगली जिल्ह्यातही लोकसंख्येच्या तुलनेत जिल्ह्यात पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात कर्मचाºयांचा अपुरा स्टाफ आहे. अशा अवस्थेतच काम सुरू आहे. प्रत्येकवर्षी ५० पेक्षा जास्त जागांसाठी भरती होते. २०१७मध्ये जिल्हा पोलीस दलात२६ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे एवढ्याच जागांसाठी भरती घेण्याची मर्यादा आहे. २६ जागा अत्यंत कमी आहेत. एवढ्या जागांसाठी पाच हजारांहून अधिक उमेदवार येऊ शकतात. यासाठी किमान दीड महिना प्रक्रिया राबवावी लागते. तसेच संपूर्ण पोलीस दलाचा वेळ खर्ची होतो. यासाठी यावर्षी भरती रद्दचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या २६ जागा व यावर्षी होणाºया रिक्त जागा अशी एकत्रित जागांची संख्या वाढवून पुढीलवर्षी भरती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.सर्वाधिक जागा : पुणे, साताºयालाकोल्हापूर परिक्षेत्रात सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर ग्रामीण व पुणे ग्रामीण हे पाच जिल्हे येतात. महाराष्टÑ पोलीस दलाच्या संकेतस्थळावर भरती प्रक्रियेची सर्व मािहती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये सांगली व कोल्हापूरला एकही जागा दिसत नाही. सातारा १२१ व पुणे ग्रामीणमध्ये सर्वाधिक १२१ जागांसाठी भरती होत आहे. सोलापूर ग्रामीणमध्ये ६३ जागांसाठी भरती होत आहे.