शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : शिवसेनेच्या मेळाव्यात जिल्हाप्रमुखांना झापले; गजानन कीर्तीकरांकडून झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 16:19 IST

सांगली महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांना खासदार गजानन कीर्तीकर यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पदाधिकारी मेळाव्याला हाताच्या बोटावर मोजण्याइतपत बुथप्रमुख व उपतालुकाप्रमुखांची उपस्थिती पाहून कीर्तीकर चांगलेच संतापले. त्यांनी व्यासपीठावरच दोन्ही जिल्हाप्रमुखांना बोलावून, मेळाव्याला नुसती गर्दी केली आहे का? सैन्य हाताखाली नाही, मग लढाई कशी जिंकणार?, आम्ही दूधखुळे वाटतो का? अशा प्रश्नांची सरबत्तीच केली. कीर्तीकरांच्या रौद्रावताराने मेळाव्याचा रंगच पालटला.

ठळक मुद्देशिवसेनेच्या मेळाव्यात जिल्हाप्रमुखांना झापलेगजानन कीर्तीकरांकडून झाडाझडती  बुथप्रमुख, उपतालुकाप्रमुखांच्या गैरहजेरीमुळे नाराजी

सांगली : महापालिकेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांना खासदार गजानन कीर्तीकर यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पदाधिकारी मेळाव्याला हाताच्या बोटावर मोजण्याइतपत बुथप्रमुख व उपतालुकाप्रमुखांची उपस्थिती पाहून कीर्तीकर चांगलेच संतापले.

त्यांनी व्यासपीठावरच दोन्ही जिल्हाप्रमुखांना बोलावून, मेळाव्याला नुसती गर्दी केली आहे का? सैन्य हाताखाली नाही, मग लढाई कशी जिंकणार?, आम्ही दूधखुळे वाटतो का? अशा प्रश्नांची सरबत्तीच केली. कीर्तीकरांच्या रौद्रावताराने मेळाव्याचा रंगच पालटला.महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी येथील भावे नाट्यगृहात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी खा. गजानन कीर्तीकर, शिवसेनेचे सचिव खा. अनिल देसाई, महिला आघाडीच्या प्रमुख छायाताई कोळी, संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील उपस्थित होते.

मेळाव्याला मार्गदर्शन करीत असतानाच गजानन कीर्तीकर यांनी, किती बुथप्रमुख व उपतालुकाप्रमुख उपस्थित आहेत, याचा आढावा घेतला. उपस्थित पदाधिकाऱ्यांना हात वर करण्यास सांगितले. त्यावेळी अगदी पाच ते सहा जणांनीच हात वर करून आपली हजेरी दर्शवली. या प्रकारामुळे कीर्तीकर चांगलेच संतापले.जिल्हाप्रमुख संजय विभुते व आनंदराव पवार यांना कीर्तीकर यांनी समोर बोलावून घेतले. कशाला आमची फसवणूक करता? आम्ही काय दूधखुळे आहोत का? असा सवाल करीत त्यांना झापले. हातात सैन्य नसताना लढाई जिंकण्यास निघाला आहात. अशा पद्धतीने संघटना चालत नाही.

मतदारांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्थाच नाही. केवळ मेळाव्याला गर्दी केली आहे. चार ते पाच नगरसेवकांवर आपण समाधान मानणार आहात का? या दोन्ही जिल्हाप्रमुखांच्या नेमणुका रद्द कराव्या लागतील, अशा शब्दात त्यांंनी दम भरला.

येत्या पंधरा ते वीस दिवसात पुन्हा मेळावा बोलवा. तेव्हा केवळ बुथप्रमुख व उपतालुकाप्रमुखच उपस्थित असतील. मेळाव्याला जे पदाधिकारी उपस्थित राहणार नाहीत, त्यांना घरी घालविले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. कीर्तीकरांच्या संतापाने मेळाव्याचा नूरच पालटला. 

टॅग्स :Gajanan Kirtikarगजानन कीर्तीकरMuncipal Corporationनगर पालिकाShiv SenaशिवसेनाSangliसांगली