शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेतील अपहार: संचालकांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधींवर डल्ला

By अशोक डोंबाळे | Updated: May 25, 2024 17:53 IST

प्रशासनाची बेफिकीर घोटाळ्यास जबाबदार

अशोक डोंबाळेसांगली : दुष्काळ, अतिवृष्टीच्या निधीवर जिल्हा बँकेच्या तासगाव तालुक्यातील शाखांमध्येच सहा ते सात कोटींवर कर्मचाऱ्यांनी डल्ला मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घोटाळ्यात १० कर्मचाऱ्यांचा सहभाग असून, बड्या संचालकांचा त्यांना वरदहस्त आहे. काही संचालकांच्या वरदहस्तामुळे कर्मचाऱ्यांनी लाखो रुपये बिनधास्त पचविले आहेत.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक अशी ओळख आहे. या बँकेच्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये २२० शाखा आहेत. उलाढाल १३ हजार कोटी रुपयांची असून, ठेवी सात हजार ९०५ कोटी रुपयांच्या आहेत. हजारांवर कर्मचारी कार्यरत आहेत. या बँकेत ठेवीदारांनी विश्वासाने ठेवी ठेवल्या आहेत. ग्रामीण भागात जिल्हा बँकच शेतकऱ्यांना आधार आहे; पण काही संचालकांच्या मनमानी कारभारामुळे बँकेतील कोट्यवधी रुपयांवर कर्मचारीच डल्ला मारत आहेत. तालुक्यातील आपले कथित राजकीय वजन अबाधित ठेवण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई काही संचालक करू देत नाहीत. त्यामुळे जिल्हा बँकेचे प्रशासन हतबल आहे. केवळ निलंबनाचे कागदी घोडे नाचवले जात आहेत. अपहारानंतरही ठोस कारवाई होत नसल्याने जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांची घोटाळे करण्याची हिंमत वाढली आहे. तासगाव तालुक्यात दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई शासनाकडून आली आहे. काही शेतकरी मयत तर काही शेतकऱ्यांची जिल्हा बँकेकडे खाती नसल्यामुळे ते पैसे घेण्यासाठी फिरकले नाहीत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून बँकेच्या अनामत खात्यामध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहेत. या निधीची फारशी चौकशी होत नसल्यामुळे चतुर कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारला आहे.सूत्राच्या माहितीनुसार जिल्हा बँकेच्या तासगाव तालुक्यातील शाखांमध्ये १० कर्मचाऱ्यांनीच जवळपास सहा ते सात कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, मिरज, खानापूर, कडेगाव, पलूस बँकांच्या शाखांमध्येही कर्मचाऱ्यांकडून अनामत रकमांवर डल्ला मारला असण्याची शक्यता आहे.

तीन वर्षांपासूनचा घोटाळादुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत केली जाते. पीक विम्याची मदतही शेतकऱ्यांना मिळते. शेतकऱ्यांच्या मदतीची सर्व रक्कम जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत अनामत खात्यावर ठेवली जाते; पण मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर न जाता बँकेतील कर्मचाऱ्यांनीच त्या रकमेवर टप्प्याटप्प्याने तीन वर्षांत लाखो रुपयांवर डल्ला मारला आहे.

कर्मचाऱ्यांनी असा मारला डल्लाजिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत अनामत रकमेची खाती आहेत. या खात्यातून वारंवार व्यवहार होत नाहीत. याचाच गैरफायदा घेऊन या शाखेतील कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या खात्यावर टप्प्याटप्प्याने रक्कम वर्ग केली आहे. त्यातूनच तासगाव तालुक्यात जिल्हा बँकेच्या १० कर्मचाऱ्यांनी सहा कोटींवर रकमेवर डल्ला मारल्याची प्राथमिक माहिती आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक