शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

सांगली : आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 13:54 IST

महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर हे गेले १५ दिवस वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे महापालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले असून प्रशासन, नागरिक, नगरसेवकांची कामे अडली आहेत. त्यामुळे आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवावा, अशी मागणी नागरिक जागृती मंचने बुधवारी केली.

ठळक मुद्देआयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवानागरिक जागृती मंचची मागणी : नगरविकास विभागाला पत्र

सांगली : महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर हे गेले १५ दिवस वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे महापालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले असून प्रशासन, नागरिक, नगरसेवकांची कामे अडली आहेत. त्यामुळे आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवावा, अशी मागणी नागरिक जागृती मंचने बुधवारी केली.याबाबतचे निवेदन नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांना फॅक्सद्वारे पाठविण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, महापालिका आयुक्त वैद्यकीय रजेवर असल्याने विकासकामांचे निर्णय खोळंबले आहेत. त्याच्या फाईली प्रलंबित आहेत.

एकाच उपायुक्तांवर महापालिकेचा कारभार सुरु आहे. महापालिका लेखापरिक्षण आणि दैनंदिन कामाबाबतही तेच निर्णय घेत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण आहे. महापालिकेत दोन उपायुक्त, मुख्य लेखापरिक्षक, शहर अभियंता व वर्ग दोनचे अधिकारी नियुक्त केले नसल्याने ती पदेही रिक्त आहेत.

त्यामुळे कामाच्या सुलभतेसाठी आयुक्तांचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रभारी कार्यभार सोपवण्यात यावा. हे निवेदन नगरविकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर आणि सचिव मनिषा म्हैसकर यांना ई मेल केल्याची माहिती नागरिक जागृती मंचचे कार्यकर्ते सतीश साखळकर यांनी दिली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली