शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त कार्यालयास टाळे ठोकणार- सांगली सुधार समितीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:21 IST

सांगली : सुधार समितीच्या रेट्यामुळे महापालिकेने महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधली; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ती कुलूपबंद अवस्थेत आहेत. ही कुलूपे काढून महिला स्वच्छतागृहे वापरासाठी खुली न केल्यास आयुक्त कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा सुधार समितीच्या अ‍ॅड. अरुणा शिंदे, तेजश्री अवघडे, शुभांगी रुईकर, मीना मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.पत्रकात म्हटले आहे की, ...

ठळक मुद्देमहिला स्वच्छतागृहे खुली करण्याची मागणी

सांगली : सुधार समितीच्या रेट्यामुळे महापालिकेने महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधली; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ती कुलूपबंद अवस्थेत आहेत. ही कुलूपे काढून महिला स्वच्छतागृहे वापरासाठी खुली न केल्यास आयुक्त कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा सुधार समितीच्या अ‍ॅड. अरुणा शिंदे, तेजश्री अवघडे, शुभांगी रुईकर, मीना मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.पत्रकात म्हटले आहे की, गेली तीन वर्षे सांगली जिल्हा सुधार समिती व राइट टू पी मुंबई यांच्यावतीने आम्ही महिलांकरिता स्वच्छ व सुरक्षित स्वछतागृह बांधण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. पुरुष स्वच्छतागृहांचा प्रतिकात्मक ताबा घेणे, परिषद भरवणे, निवेदन व आंदोलने याबरोबरच महिला स्वच्छतागृहांचा आराखडासुद्धा आम्ही प्रशासनाला दिला. तसेच पाठपुरावा करत निधीसाठी तरतूद करायला भाग पाडले. वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर प्रशासनाने महापालिका क्षेत्रात महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधली. याकरिता राइट टू पी मुंबईने राज्य शासनाला दिलेल्या महिला स्वच्छतागृहांसाठीच्या अद्ययावत आराखडा स्वीकारला गेला. त्यानुसार महापालिका क्षेत्रामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्यास महापालिकेने सुरुवात केली. ती बांधून पूर्ण झाली तरीही अद्याप ती वापरासाठी खुली केली नाहीत. याबाबत पाठपुरावा करूनही प्रशासनाने त्या स्वच्छतागृहांना कुलूप लावून ठेवली आहेत व पाण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे या महिला स्वच्छतागृहांची कुलूपे काढून तेथे पाण्याची तसेच देखभाल व सुरक्षेची सोय करून ती वापरासाठी खुली न केल्यास आयुक्त कार्यलयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा दिला आहे. पत्रकावर प्रा. राणी यादव, अलका पाटील, ज्योती बारडोल, मधु गिड्डे, मुबीना पटेल, रेवती शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीcommissionerआयुक्त