शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: सांगलीत वन विभागाच्या भरती परीक्षेत पुन्हा घोळ, छत्रपती संभाजीनगर येथील डमी विद्यार्थी जाळ्यात

By शरद जाधव | Updated: August 8, 2023 23:02 IST

Sangli: वन विभागाच्या वनरक्षक परीक्षेत कॉपीचा प्रयत्न करणारा तरुण गेल्याच आठवड्यात अटक केला असताना सांगलीत पुन्हा एकदा या परीक्षेत घोळ झाला आहे. त्यानुसार आता  एका डमी उमेदवारास रंगेहात पकडले.

- शरद जाधवसांगली - वन विभागाच्या वनरक्षक परीक्षेत कॉपीचा प्रयत्न करणारा तरुण गेल्याच आठवड्यात अटक केला असताना सांगलीत पुन्हा एकदा या परीक्षेत घोळ झाला आहे. त्यानुसार आता  एका डमी उमेदवारास रंगेहात पकडले. प्रदीप कल्याणसिंग बैनाडे (रा.बेंद्रेवाडी जि. औरंगाबाद) असे पकडलेल्या डमी उमेदवाराचे नाव आहे. संशयित बैनाडे हा राहुल सुखलाल राठोड (वय २८ रा. हरसील जि. औरंगाबाद) याच्या जागी डमी परीक्षा देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मिरज रोड वरील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट कॉलेजमध्ये हा प्रकार उघडकीस आला. गेल्या आठवड्यापासून सांगलीत वन विभागाच्या भरती परीक्षा सुरू आहेत. सध्या वन रक्षक पदासाठी परीक्षा होत आहेत. संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होत असतानाही यात गैरप्रकार समोर येत आहेत.

वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्च या कॉलेजमध्ये वनविभागाच्या वन रक्षक पदासाठीच्या भरतीचा पेपर मंगळवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास पेपर सुरु झाल्यानंतर संशयित हा वनविभागाच्या परीक्षेचा फॉर्म भरलेला मूळ उमेदवाराच्या जागी डमी उमेदवार म्हणून परीक्षा देण्यासाठी केंद्रात आला होता. परीक्षा सुरु झाल्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे हे उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करत असताना  कागदपत्रांबाबत संशय आला. सखोल चौकशी केली असता डमी उमेदवार म्हणून परीक्षेसाठी बसल्याची बाब लक्षात आली. यानंतर तातडीने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. संशयितांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Sangliसांगली