शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : अंध कलाकारांची थक्क करणारी सुरांची मैफील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 13:45 IST

सांगली :  अंध असणाऱ्या... पण मनाने कलाकार असणाऱ्या गायकांनी थक्क करणारी सुरेल गाणी सादर करुन सांगलीकरांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. तर ...

ठळक मुद्देअंध कलाकारांची थक्क करणारी सुरांची मैफीलमहापालिकेच्या दिव्यांग मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम

सांगली :  अंध असणाऱ्या... पण मनाने कलाकार असणाऱ्या गायकांनी थक्क करणारी सुरेल गाणी सादर करुन सांगलीकरांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. तर शासकीय अपंग बालमंदिर आणि प्रभात मंदिरच्या मतीमंद मुलांनी सादर केलेल्या नृत्यांनी रसिकांना ताल धरायला लावला. मन आणि शरीर अपंग असतानाही या मुलांनी गाण्याच्या नृत्यातून दाखवलेली अदाकारी थक्क करणारी होती.निमित्त होते सांगली महापालिकेच्या जागतिक दिव्यांग दिनाचे...मंगेशकर नाट्यगृह तुडूंब भरलेले... आपलेच दिव्यांग, अंध, मतीमंद सहकारी कला सादर करताना...त्याला दाद देताना होणारा आनंद गगनात मावेना अशी अवस्था त्यांच्या पालकांची झाली होती.

परिस्थितीने आपल्या पाल्याला आलेले अपंगत्व त्या कलेमुळे पालकही आनंदीत झाले होते. महापौर संगीता खोत, उपायुक्त स्मृती पाटील, नगरसेविका स्वाती शिंदे, भारती दिगडे आदींच्या संकल्पनेतून दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता.स्वरगंधार या संस्थेने अंध गायक कलाकारांचा थक्क करणारा कार्यक्रम सादर केला. मार्गदर्शक रामदास कोळी, मनिषा नवाळे, सुजाता वाघमारे यांनी संयोजन केले होते. महेश नवाळे, मनिषा नवाळे यांच्या संयोजनातून साकारलेला अंधाचा कार्यक्रम शेवटपर्यत रंगला.

विक्रम पवार, मकरंद पारवे, सुनिता सुनवणे, रविंद्र सुनवणे या अंध गायकांनी सत्यम शिवम सुंदरम््, रुपेरी वाळूत ,जिवा शिवाची बैलजोड, देवाक काळजी , पापा कहते है, सोला बरस की, चढता सुरु, या रावजी, अशी अनेक हिंदी, मराठी गाणी सादर केली.

डोळे नसताना शब्दांचा गोडवा ओठातून आवाजातून झिरपत होता. संगीत साथ महेश नवाळे (तबला), प्रविण पाखरे (ड्रम, आॅक्टोपॅड), सालम नदाम, सचिन कांबळे (कि बोर्ड), सतिश वाघमारे (ढोलकी)यांनी केली.

टॅग्स :musicसंगीतSangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका