शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत महाविद्यालयीन विद्यार्थीनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 17:10 IST

विश्रामबाग येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील अक्षता प्रवीण कोष्टी (वय १८, रा. गुरुवार पेठ, डफळापूर, ता. जत) या विद्यार्थीनीने मुलींच्या वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. घटनेची विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद आहे.

ठळक मुद्देसांगलीत महाविद्यालयीन विद्यार्थीनीची आत्महत्यामृत डफळापूरची : वालचंदमधील घटना

सांगली : विश्रामबाग येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील अक्षता प्रवीण कोष्टी (वय १८, रा. गुरुवार पेठ, डफळापूर, ता. जत) या विद्यार्थीनीने मुलींच्या वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. घटनेची विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद आहे.

अक्षता कोष्टी वालचंद महाविद्यालयात स्थापत्य अभियंता पद्विकेच्या पहिल्या वर्षात शिकत होती. ती महाविद्यालयातील वसतीगृहात राहत होती. तिच्या खोलीत आणखी सहा मुली राहतात. सोमवारी सकाळी सहापैकी काही मुली महाविद्यालयात, तरी काहीजणी क्लासला गेल्या होत्या. खोलीत अक्षता एकटीच होती. त्यावेळी तिने खोलीचा दरवाजा उघडा ठेऊन पंख्याला ओढणीने गळफास लाऊन घेतला.

साडेअकरा वाजता खोलीतील एक मुलगी क्लासमधून आली. खोलीचा दरवाजा उघडा असल्याने ती थेट आत गेली. त्यावेळी अक्षताचा मृतदेह गळफासाने लटकत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहून तिने आरडाओरड केली. तिच्या आवाजाने वसतिगृहातील मुलींनी धाव घेतली. महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यपकही आले. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांना पाचारण करण्यात आले.अक्षताची बहिण सांगलीतच शिक्षणानिमित्त राहते. पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधून बोलावून घेतले. पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. शासकीय रुग्णालयात विच्छेदन तपासणी करण्यात आली. या घटनेचे वृत्त समजताच अक्षताचे आई-वडील व अन्य नातेवाईक दाखल रुग्णालयात दाखल झाले होते. सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.मोबाईलवर गाणीआत्महत्या करण्यापूर्वी अक्षताने मोबाईलवर गाणी लावली होती. तिने आत्महत्या केल्यानंतरही गाणी तशीच सुरु होती, असे तिच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले. अक्षताच्या वडिलांचे डफळापुरात किराणा मालाचे मोठे दुकान आहे. पोलिसांनी तिच्या खोलीची झडती घेतली. तिने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहली आहे का, याचा शोध घेतला. पण काहीच सापडले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली