शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली ‘सिव्हिल’मध्ये उपचार महागले! आजपासून अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:20 IST

सांगली : गोरगरिबांचा आधार म्हणून पश्चिम महाराष्ट्रत लौकिक असलेल्या सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय (सिव्हिल) रुग्णालयातील उपचार महागले आहेत.

सचिन लाड ।सांगली : गोरगरिबांचा आधार म्हणून पश्चिम महाराष्ट्रत लौकिक असलेल्या सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय (सिव्हिल) रुग्णालयातील उपचार महागले आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने उपचार खर्च वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवार, दि. ३ एप्रिलपासून केली जाणार आहे. दहा ते पन्नास रुपयांपर्यंत ही वाढ केलेली आहे.

महागडे उपचार व अत्याधुनिक तपासणीची यंत्रणा बसविली जात असल्याने उपचाराच्या दरात वाढ केल्याची स्पष्टोक्ती वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली आहे. पण मुळातच सिव्हिलमध्ये येणारे रुग्ण गरीब आहेत. मोफत उपचार केले जातात, असा विचार करून काहीजण दाखल होतात; पण आता केसपेपरपासून ते औषधोपचारापर्यंतच्या खर्चात दहा ते पन्नास रुपयांपर्यंत वाढ झाल्याने रुग्णांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. गेल्या दहा वर्षांत ही दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. दहा वर्षांपूर्वी पाच रुपये केसपेपर शुल्क होते. पाच वर्षांपूर्वी केलेल्या दरवाढीत केसपेपरचा दर दुप्पट करण्यात आला. आताच्या दरवाढीतच हा दर दुप्पटच केला आहे. खासगी रुग्णालयात उपचार महागडे असल्याने ते सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे ते सिव्हिलचा आधार घेतात.

गेल्या काही वर्षांत सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर व कर्नाटकातील रुग्ण येथे दाखल होत आहेत. दररोज किमान दीड हजारहून अधिक रुग्ण येतात. सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत बाह्यरुग्ण (ओपीडी) विभाग तुडूंब भरलेला असतो. तसेच नेहमी चारशे ते साडेचारशे रुग्ण वॉर्डात दाखल होऊन उपचार घेतात. रुग्णांची वाढती संख्या, त्यांच्यावरील उपचार खर्च आणि विविध तपासण्या करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री बसविली जात आहे. पण त्या तुलनेत उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने सर्वप्रकारच्या तपासण्या, उपचार, केसपेपर, ड्रेसिंग, आहार, अतिदक्षता विभाग, सर्वसाधारण वॉर्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, वयाचे दाखले आदी प्रकारात दर वाढविले आहेत.समिती गठितवैद्यकीय शिक्षण विभागाने उपचाराचे दर वाढविण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयातील तज्ज डॉक्टरांची समिती गठित केली होती. तसेच नागपूर, औरंगाबाद व पुणे येथील शासकीय रुग्णालयात अधिष्ठातांकडून शिफारशी मागवून घेतल्या होत्या. सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या अधिपत्याखाली येणाºया रुग्णालयातील दरात तफावत नको, असा विचार करून ही दरवाढ केली आहे. याची अंमलबजावणी येत्या ३ एप्रिलपासून राज्यात सर्व शासकीय रुग्णालयात केली जाणार आहे. 

वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार मंगळवारपासून नवीन दरवाढीची अंमलबजावणी केली जाणार आहे. संबंधित विभागांना तसे आदेश दिले आहेत. किरकोळ स्वरुपाची ही दरवाढ आहे. दरवाढ केली जाणार असल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर केले होते. रुग्णालयात तसा फलकही लावण्यात आला होता. - डॉ. नंदकिशोर गायकवाड, उपवैद्यकीय अधीक्षक, सिव्हिल, सांगली.

टॅग्स :Sangliसांगलीmedicinesऔषधं