शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
2
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
3
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
4
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
5
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
6
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
7
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
8
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
9
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
10
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
11
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
12
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
13
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
14
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
15
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
16
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
17
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
18
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
19
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
20
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

सांगली शहर पोलिसांची खरडपट्टी!

By admin | Updated: March 29, 2015 00:42 IST

पोलीसप्रमुख आक्रमक : अधिकारी फैलावर; कामाचा आढावा

सांगली : शहर पोलीस ठाण्यातील कामगिरीवर जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांनी फैलावर घेत गेल्या वर्षभरात गुन्हे प्रगटीकरण (डीबी) शाखेने काय कामगिरी केली, किती गुन्हे उघडकीस आणले, याचा आढावा घेतला. पोलिसांचा शहरात का धाक नाही? मुख्य बसस्थानक व आठवडा बाजारात चोऱ्या होऊनही त्या उघडकीस आणल्या जात नाहीत? शशिकांत पावसकर या तरुणाच्या खुनाचे गूढ का उकलले जात नाही? यासंदर्भातही विचारणा केली. गुन्हे उघडकीस आणणारी शाखा म्हणून डीबी पथकाकडे पाहिले जाते. या पथकात दोन पोलीस अधिकाऱ्यासह पंधरा कर्मचाऱ्यांचा भरणा आहे. पावसकरच्या खुनाचा छडा लावतो, असे छातीठोकपणे डीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले होते. सहा महिने होऊन गेले तरी या अधिकाऱ्यासह तपासाचा एकही धागा हाती लागला नाही. यामुळे सावंत यांनी डीबीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. मुख्य बसस्थानक, आठवडा बाजारात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. फाळकूटदादांची दहशत वाढत शहर पोलीस करतात तरी काय? असा सवाल सावंत यांनी केला. निरीक्षक मोरे यांच्याशी संपर्क साधूला रात्री उशिरा त्यांनी ‘डीबी’चे अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. गेल्या वर्षभरात डीबी पथकाने काय कामगिरी केली, याची माहिती घेतली. मात्र काम समाधानकारक नसल्याने सावंत यांनी सर्वांची चांगलीच खरडपट्टी केली. पोलीसप्रमुखांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे शहर पोलिसांची विशेषत: डीबी पथकाची पळताभूई थोडी झाली आहे. ‘डीबी’तडजोडीत माहीर! ‘डीबी’ पथकाने चोर पकडला तर, पुढे सरकत नाही. चोरट्यास ताब्यात घेतल्याची कोठेही नोंद केली जात नाही. चोरीतील माल जप्त केला जातो; पण तो रेकॉर्डवर घेतला जात नसल्याची चर्चा होती. यासंदर्भात सावंत यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. घरफोडीतील एका सराईत गुन्हेगारास तब्बल दहा दिवसांनी अटक दाखविली. आठवड्यापूर्वी एका जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा टाकला. छाप्याची चाहूल लागल्याने एकाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये त्याचा पाय मोडला. या कारवाईचीही नोंद केली नाही. आठवडा बाजारात चोरी करताना महिलेस पकडले. तिच्याकडून माहिती घेऊन सराफासह दोघांना उचलून आणले. मोठ्या प्रमाणात दागिने व रोकड जप्त केली. परंतु याचीही कुठे नोंद केली नसल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)