शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

फटाक्यांच्या आतषबाजीत उजळली सांगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 23:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : समृद्धीचा मंत्र जपत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहाच्या खळाळत्या लाटांनी गुरुवारी सांगली शहरात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले. रांगोळी, फुला-पानांची आरास, लक्ष दिव्यांनी उजळलेले शहर आणि त्याच्या थाटात भर टाकण्यासाठी केलेल्या फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत सांगलीकरांनी सणाचा आनंद लुटला.दीपावलीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. रविवारी जिल्ह्यासह शहरात दिवसभर ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : समृद्धीचा मंत्र जपत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहाच्या खळाळत्या लाटांनी गुरुवारी सांगली शहरात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले. रांगोळी, फुला-पानांची आरास, लक्ष दिव्यांनी उजळलेले शहर आणि त्याच्या थाटात भर टाकण्यासाठी केलेल्या फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत सांगलीकरांनी सणाचा आनंद लुटला.दीपावलीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. रविवारी जिल्ह्यासह शहरात दिवसभर लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू होती. कुटुंबासह व्यवसायात स्थिरता, आर्थिक स्थैर्य देणाºया लक्ष्मीचा वरदहस्त कायम रहावा, या प्रार्थनेसह जोरदार आतषबाजी करत शहरात रविवारी सायंकाळी लक्ष्मीपूजन उत्साहात पार पडले. लक्ष्मी पूजनावेळी दिव्यांचा झगमगाट, फुलांचा सुवास, उदबत्तीचा घमघमाट याने प्रसन्न वातावरणाची निर्मिती केली. खास दिवाळीसाठी खरेदी केलेले नवीन कपडे, दागिने घालून घराघरांत नव्या नवलाईनेही वास केला होता. घरातील सोने, चांदी, पैशाचीही पूजा करण्यात आली. लक्ष्मी पूजनादिवशी केरसुणीला लक्ष्मीचेच स्थान दिले जाते. त्यामुळे आज त्याचीही खरेदी करण्यात आली. अनेकांची दिवाळी खरेदी आधीच झाली असली, तरी आजही खरेदी करणाºयांची संख्या कमी नव्हती. आजच्या खरेदीत आयत्या वेळची धावपळ जाणवत होती.व्यावसायिकांनी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी दारावर लावलेल्या फुलांच्या तोरणांमुळे पेठेतील उत्सवात रंग भरला. सायंकाळी दुकानदारांनी दुकानात पूजा केली. रात्री आठच्या सुमारास घराघरांत, दुकानात लक्ष्मी पूजन झाले. त्यानंतर शहरात सर्वत्र जोरदार आतषबाजीने उत्सव साजरा करण्यात आला.वाहतुकीची कोंडीसांगलीच्या हरभट रोड, शिवाजी मंडई, टिळक चौक, कापड पेठ या मुख्य बाजारपेठांमधील रस्त्यांवर दिवसभर वाहतुकीची कोंडी होती. नागरिकांनाही वाहनांचे पार्किंग कुठे करायचे, असा प्रश्न पडला होता. दरवर्षी ही परिस्थिती निर्माण होते. ं