शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

सांगली-बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्सप्रेसला आता आणखी एक अतिरिक्त जनरल डबा 

By अविनाश कोळी | Updated: July 18, 2024 15:40 IST

पासधारक प्रवाशांची सोय : जनरल तिकिटांचा कोटा वाढला

सांगली : सांगली-बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्सप्रेसला आता आणखी एक अतिरिक्त जनरल डब्बा जोडण्यात आला आहे. त्यामुळे पासधारक प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. जनरल तिकिटांचा कोटाही यामुळे वाढला आहे.सांगली रेल्वे स्टेशनवरून उगार, चिंचली, रायबाग, चिकोडी रोड, घटप्रभा, गोकाक रोड, पाचापूर, बेळगाव, खानापूर, लोंढा, अलनावर, धारवाड, हुबळी, दावणगिरी, आर्सिकेरी, तुमकूरु, बेंगलोर आदी ठिकाणी जाणाऱ्या जनरल तिकीट व मासिक पास घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे.सांगली-बेंगलोर राणी चन्नम्मा एक्सप्रेस व बेंगलोर-सांगली राणी चेनम्मा एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांना रेल्वेने एक अतिरिक्त जनरल डब्बा जोडला आहे. त्यामुळे आता सांगली रेल्वे स्टेशन वरून सुटणाऱ्या राणी चेन्नम्मा एक्सप्रेसची क्षमता वाढलेली आहे व जास्त प्रवासी या गाडीने सांगली रेल्वे स्टेशन वरून प्रवास करू शकतील. त्यामुळे सांगलीतून जनरल तिकीट व मासिक पास घेऊन दावणगिरीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विशेष सोय झाली आहे. ज्येष्ठ नागरिक, स्तनदा माता, महिला तसेच रुग्णांना सांगली ते बेळगाव मार्गावर या एक्सप्रेसच्या माध्यमातून आरामदायक प्रवास करता येईल.अतिरिक्त जनरल डब्यामुळे बसून प्रवास करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे कोणालाही उभे राहून प्रवास करावा लागणार नाही. पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुपने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बेळगाव तसेच धारवाड जिल्ह्यात जाणाऱ्या जास्तीत जास्त प्रवाशांनी सांगली स्थानकावरुन प्रवास करावा.

सांगली स्थानकावर पास उपलब्धसांगली ते बेळगावपर्यंतचे मासिक पास सांगली स्थानकावर उपलब्ध आहेत. सांगली ते बेळगाव पास घेतला तर प्रवाशांना सांगली ते बेळगाव कुठल्याही गाडीत प्रवास करता येतो. सांगली ते बेळगाव पासवर मिरज ते बेळगाव मार्गावर कितीही वेळा प्रवास करता येतो, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रुपने दिली.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेpassengerप्रवासी