शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

Sangli: सांगली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे होणार पेपरलेस, १ जूनपासून ऑनलाईन कामकाज

By संतोष भिसे | Updated: May 23, 2023 19:00 IST

Sangli: सांगली जिल्ह्यातील सर्व म्हणजे ६४ प्राथमिक आरोग्य केंद्रे १ जूनपासून पेपरलेस होणार आहेत. केसपेपरपासून सर्व वैद्यकीय कामकाज ऑनलाईन होणार आहे. त्याच्या प्रशिक्षणाची सुरुवात मंगळवारी (दि. २३) जिल्हा परिषदेत झाली.

- संतोष भिसेसांगली : जिल्ह्यातील सर्व म्हणजे ६४ प्राथमिक आरोग्य केंद्रे १ जूनपासून पेपरलेस होणार आहेत. केसपेपरपासून सर्व वैद्यकीय कामकाज ऑनलाईन होणार आहे. त्याच्या प्रशिक्षणाची सुरुवात मंगळवारी (दि. २३) जिल्हा परिषदेत झाली.

मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते प्रशिक्षणाचा प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, साथ रोग अधिकारी डॉ. संतोष पाटील, डॉ. विनायक पाटील आदी उपस्थित होते.आज पहिल्या दिवशी तासगाव तालुक्यातील सात आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व आरोग्य केंद्रांतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले जाईल. सध्या केंद्रांमध्ये केसपेपर, तपासणी, औषध योजना व औषध वाटप, आंतररुग्ण, गर्भवती स्त्रिया, लसीकरण आदी सर्व कामकाजाच्या नोंदी ऑफलाईन स्वरुपात होतात. १ जूनपासून त्या ऑनलाईन होतील. त्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे.डुडी म्हणाले की, रुग्णाच्या केसपेपरपासून सर्व नोंदी संगणकीय प्रणालीत केल्या जातील. त्यासाठी त्याचा मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक आदी तपशील नोंदवला जाईल. डॉ. माने म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रे ऑनलाईन स्वरुपात परस्परांशी जोडली जातील. त्यामुळे रुग्ण कोणत्याही केंद्रात उपचार घेऊ शकेल. तेथे त्याचा नोंदणी क्रमांक टाकताच यापूर्वीच्या उपचारांची सर्व माहिती तात्काळ मिळेल. या प्रणालीसाठी प्रत्येक आरोग्य केंद्राला चार संगणक देण्यात येत आहेत.

नव्या प्रणालीमुळे दररोजची रुग्णसंख्या, रुग्ण किती वाजता आला आणि किती वाजता उपचार मिळाले?, केंद्रातील औषध साठा, कोणाला किती व कोणती औषधे दिली? आदी सर्व तपशील नोंद होणार आहे. केंद्रांना गावातूनच औषधांसाठीची मागणी नोंदवता येईल. स्मार्ट पीएचसी अंतर्गत रुग्णसेवा अधिक गतिमान व पारदर्शक होण्यासाठी या प्रणालीचा वापर होईल. यामुळे आरोग्य केंद्रे पेपरलेस होणार आहेत.

टॅग्स :Sangliसांगली