शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

सांगलीत रंगली ‘सूर पहाटे’ची मैफल

By admin | Updated: March 22, 2015 00:24 IST

गुढीपाडवा : रोटरी क्लबसह विविध मंडळांकडून नववर्षाचे स्वागत

सांगली : गुढीपाडव्यानिमित्त आज, शनिवारी पहाटे स्वरगंधित करणारी ‘सूर पहाटेची मैफल’ रंगली. या मैफलित नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. रोटरी क्लब आॅफ सांगली, विश्वजागृती मंडळ, अ‍ॅक्टीव्ह ग्रुप, रंगवेध, संगीत साधना, देवल स्मारक, संस्कार भारती अशा सांस्कृतिक क्षेत्रातील संस्था एकत्रित येऊन गेली १९ वर्षे हा उपक्रम राबवित आहेत. पहाटे पाच वाजता सुरू झालेल्या सूर पहाटेच्या या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक पं. ऋषिकेश बोडस यांनी तोडी राग, तराना व अभंग गाऊन अवघे वातावरण स्वरांनी भारून टाकले. ज्येष्ठ गायक विजयराव कुलकर्णी, उभरता गायक कलाकार सुकृत ताम्हणकर, सौ. भक्ती साळुंखे-लाटवडे, सौ. अमृता धारप (पनवेल), कु. अंकिता आपटे यांनी भक्ती व भावरसांची लोकप्रिय गाणी सादर करून सूर पहाटेचे या कार्यक्रमाची रंगत वाढवत नेली. ज्येष्ठ हार्मोनियमवादक भास्कर पेठे यांनी या कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले होते. त्यांना प्रशांत भाटे (सिंथेसायझर), परेश पेठे (तबला), सुशांत कुलकर्णी (तालवाद्ये), कु. मनाली रानडे (बासरी) यांनी साथसंगत केली. ‘तेजोनिधी लोक गोल’, ‘आनंदी आनंद’, ही गाणी विजयराव कुलकर्णी यांनी सादर केली, तर सुकृत ताम्हणकर यांनी ‘मलयगिरीचा चंदन गंधीत’, ‘पद्मनाभा नारायणा’, ‘त्रिवार जयजयकार’ ही गाणी सादर केली. भक्ती साळुंखे लाटवडे यांनी ‘घनरानी साजणा’, ‘त्या चित्त चोरट्याला’ ही गाणी प्रभावीपणे सादर केली, तर सुकृत ताम्हणकर यांच्या साथीने ‘बाजेरे मुरलिया बाजे’, हे युगलगीतही सादर केले. या कार्यक्रमासाठी अरुण दांडेकर, महेश कराडकर, प्रकाश आपटे, सती भोरे, सुहास पावसकर, सनीत कुलकर्णी, चंद्रकांत पाटील, ए. आर. जोशी आदींनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)