शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

मोदींच्या शपथग्रहण दिनी निषेध, संयुक्त किसान मोर्चाने पाळला काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 18:30 IST

Morcha Sangli : प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदींचे २६ मे २०१४ रोजी झालेले शपथग्रहण म्हणजे भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केले आहे. त्यानुसार बुधवारी (दि.२६) जिल्हाभरात मोर्चातर्फे घरांघरांवर शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकावले.

ठळक मुद्देमोदींच्या शपथग्रहण दिनी निषेध, संयुक्त किसान मोर्चाने पाळला काळा दिवससंयुक्त किसान मोर्चातर्फे फडकावले घराघरावर काळे झेंडे

सांगली : प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदींचे २६ मे २०१४ रोजी झालेले शपथग्रहण म्हणजे भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे संयुक्त किसान मोर्चाने जाहीर केले आहे. त्यानुसार निषेध म्हणून बुधवारी (दि.२६) जिल्हाभरात मोर्चातर्फे घरांघरांवर शेतकऱ्यांनी काळे झेंडे फडकावले.मोर्चाच्या चलो दिल्ली किसान आंदोलनालाही आजच सहा महिने पूर्ण झाले. शिवाय, ३० मे २०१९ रोजी मोदी यांनी दुसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. केंद्रीय कामगार संघटनांच्या देशव्यापी संपालाही सहा महिने पूर्ण झाले. याचे निषेध करत मोर्चाने काळा दिवस पाळला.मोर्चाने भूमिका स्पष्ट केली की, गेली सात वर्षे सत्तेतील मोदी सरकारने मोठ्या आश्वासनांपैकी एकही पाळले नाही. कष्टकऱ्यांच्या इच्छा, आकांक्षांच्या विरोधात बेदरकार वागत आहे. लोकसभेतील पाशवी बहुमताच्या जोरावर मनमानी करत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेजबाबदारपणामुळे हजारो लोकांचे जीव जात आहेत.महामारीशी दोन हात करण्याची जबाबदारी झटकून संपूर्ण ओझे राज्यांच्या खांद्यावर टाकले आहे. लसींच्या मात्रा, ऑक्सिजन, रुग्णालयांतील खाटा, मृतांचे अंत्यसंस्कार या सर्वच बाबतीत धोकादायक स्थिती आहे. संकटकाळाला तोंड देण्याविषयी अनभिज्ञताच सिद्ध झाली आहे.भांडवलदारांच्या फायद्यासाठी बनवलेले कायदे मंजूर करवून घेण्यासाठीच महामारीचा उपयोग मोदी सरकार करुन घेत आहे. असंघटित कामगार, स्थलांतरीतांना या काळात धान्य, रोख रक्कम आणि रोजगाराची गरज आहे. पण मदतीच्या आघाडीवर सरकारला लकवा झाला आहे.कोविडसाठी निधी नसताना सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी मात्र २० हजार कोटींची उधळपट्टी सुरु आहे. सीबीआय, ईडी, एनआयए, सर्वोच्च न्यायालय, आरबीआय, निवडणूक आयोग, राज्यपाल या घटनात्मक संस्था विरोधकांना नमवण्यासाठी वापरल्या जात आहेत. या सर्वाच्या निषेध म्हणून बुधवारी काळा दिवस पाळण्यात आला. जिल्ह्यात उमेश देशमुख, दिगंबर कांबळे, रेहाना शेख, तुळशीराम गळवे, हणमंत कोळी, वसंत कदम, गुलाब मुलाणी, मीना कोळी आदींनी आंदोलनाचे नियोजन केले.

टॅग्स :Morchaमोर्चाNarendra Modiनरेंद्र मोदीSangliसांगली