शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गतनिवडणुकीतील नाराज संभाजी पवार गट संजयकाकांच्या प्रचारात सक्रीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 19:40 IST

संजयकाका पाटील यांच्या विजयासाठी जिवाचे रान करू, असा निर्धार शिवसेनेचे नेते गौतम पवार यांनी सांगलीत व्यक्त केला. 

सांगली : गत निवडणुकीत संजयकाका पाटील यांच्या भाजप प्रवेशाने नाराज झालेला संभाजी पवार गट आता नाराजी दूर झाल्यानंतर प्रचारात सक्रीय झाला आहे. संजयकाका पाटील यांच्या विजयासाठी जिवाचे रान करू, असा निर्धार शिवसेनेचे नेते गौतम पवार यांनी सांगलीत व्यक्त केला. 

सांगली येथील छत्रपती शिवाजी मंडई भाजी विक्रेते संघटना, शहरातील फेरीवाले संघटनेच्यावतीने  प्रचार बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संजय पाटील यांचे पुत्र युवानेते प्रभाकर पाटील, नगरसेविका स्वाती शिंदे, सुब्राव मद्रासी, सतीश पवार उपस्थित होते.पवार म्हणाले, संभाजी पवार यांनी शहराच्या विकासासाठीच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पंधरा वर्षापूर्वीच त्यांनी भाजपमधून सांगलीत अनेक कामे केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संभाजी पवार यांचे नाते अतूट आहे. गेल्या पाच वर्षांत जरी दुरावा निर्माण झाला तरी ऋणानुबंध कायम आहेत. पुन्हा मोदी पंतप्रधान होणे देशाच्या विकासाच्यादृष्टीने गरजेचे आहे. त्यासाठी पवार गट जीवाचे रान करेल, रात्रीचा दिवस करेल. 

काँग्रेस-राष्ट्रवादीने शहर आणि जिल्ह्याला मागे नेले. येथील भाजी मंडई, फेरीवाला धोरणासह शहराच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी संजय पाटील यांना साथ द्यायला हवी. भाजपच्या माध्यमातून शहराला सर्वोत्तम बनविण्याचा प्रयत्न यापुढील काळात केला जाईल. 

प्रभाकर पाटील म्हणाले, संभाजी पवार गटाच्या पाठिंब्याने आम्हाला हत्तीचे बळ मिळाले आहे. त्यामुळे विरोधकांच्याही उरात धडकी भरली आहे. भाजप-सेनेच्या महायुती सरकार महिला सन्मानाच्या विविध योजना राबविल्या आहेत. त्यामुळे महिला संजय पाटील यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करतील, असे सौ. रंजना संभाजी पवार यांनी व्यक्त केले. येथील गवळी गल्लीत सौ. ज्योती संजय पाटील यांच्या उपस्थितीत महिला मेळावा पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, भारती दिगडे आदी उपस्थित होत्या. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsangli-pcसांगलीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019