शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील कुपवाडमध्ये 'ते' सांबर अखेर सहा दिवसानंतर सापडले, मोहिमेसाठी राबवली 'बोमा पद्धत'; नेमकी काय?

By श्रीनिवास नागे | Updated: December 7, 2022 18:44 IST

या मोहिमेमध्ये वन विभागाकडून सांबरास कोणतीही इजा होऊ दिली नाही, मात्र, दोन वनमजूर किरकोळ जखमी झाले

सांगली : कुपवाड शहरातील वसंतदादा सूतगिरणी परिसरात सलग सहा दिवस मुक्काम ठोकून बसलेल्या सांबरास बुधवारी पहाटे वन विभागाकडून ताब्यात घेण्यात आले. वन विभागाकडून ही मोहीम बोमा पद्धत वापरून सलग १२० तास अथक प्रयत्न करून यशस्वी करण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात आल्यानंतर सांबर सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वन विभागाकडून संबंधित सांबरास चांदोली अभयारण्याच्या अधिवासात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.मिरज एमआयडीसीतील गोदरेज कारखान्याच्या परिसरात दोन डिसेंबर रोजी नागरिकांना सांबर दिसून आले होते. त्यानंतर वन विभागाकडून हे सांबर पकडण्यासाठी व त्याला वन अधिवासात सोडून देण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती. उपवनसंरक्षक नीता कट्टी, सहायक वनसंरक्षक डॉक्टर अजित साजने, वनपरिक्षेत्र अधिकारी युवराज पाटील, महंतेश बंगले, वन्यजीव रक्षक अजित ऊर्फ पापा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोमा पद्धतीचा वापर करून सलग १२० तासाच्या अथक प्रयत्नानंतर सांबरास ताब्यात घेण्यात आले. या मोहिमेमध्ये वन विभागाकडून सांबरास कोणतीही इजा होऊ दिली नाही. त्याला वनविभागाकडून पकडण्यात आल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद ढगे यांनी सांबराची तपासणी केली. ते सुस्थितीत व वन अधिवासात सोडण्यास योग्य असल्याचे डॉ. ढगे यांनी सांगितले. त्याला चांदोली अभयारण्याच्या अधिवासात सोडून देण्यात येणार आहे, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली. या मोहिमेदरम्यान सांबर पकडण्यासाठी आलेले दोन वनमजूर किरकोळ स्वरूपात जखमी झाले. या मोहिमेसाठी सामाजिक संघटनांनी मोलाची मदत केली असे वन विभागाकडून सांगण्यात आले.

काय आहे ही बोमा पद्धत.... वन्यप्राणी पकडण्यासाठी राबवली जाणारी बोमा पद्धत ही आफ्रिका या देशांमध्ये फार लोकप्रिय आहे. या पद्धतीचा वापर भारत देशामध्ये ही केला जातो. हरीण, सांबर या वन्यप्राण्यांना पकडण्यासाठी ही पद्धत प्रामुख्याने वापरली जाते. या पद्धतीमुळे वन्य प्राण्यास कोणतीही इजा होत नाही. या पद्धतीमध्ये वन्यप्राण्याला गोंधळात टाकून त्याला वन पिंजऱ्यात पकडले जाते. त्याची वैद्यकीय तपासणी करून वन अधिवासात सोडले जाते.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग