पुनवत : कणदूर (ता. शिराळा) येथील निवृत्त मुख्याध्यापिका साखराबाई गणपती कदम (वय ८६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. साखराबाई या गावातील पहिल्या प्राथमिक शिक्षिका होत. अविवाहित राहून त्यांनी आपल्या पाच लहान भावंडांना शिक्षण दिले. त्यांचे पाचही भाऊ मुख्याध्यापक, सैन्य दलात ब्रिगेडियर, पोलीस उपआयुक्त, प्रिमीयर कंपनीत, पोलीस निरीक्षक असे विविध क्षेत्रात चमकले आहेत.
जिल्हा परिषदेमार्फत १९७० मध्ये कणदूर येथे मुलींची वेगळी शाळा सुरू करण्यात साखराबाई यांनी सिंहाचा वाटा उचलला. शिराळा पंचायत समितीने दोनवेळा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. अखेरपर्यंत त्या महिलांसाठी काम करत राहिल्या. त्यांच्या पश्चात चार भाऊ, दोन बहिणी, भावजया, भाचे असा परिवार आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बांबवडे शाखेचे निरीक्षक संग्राम कदम यांच्या त्या आत्या होत.
270821\img-20210827-wa0009.jpg
फोटो - साखराबाई कदम