शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सदाशिवराव पाटील यांचा प्रदेश कॉँग्रेस उपाध्यक्षपदाचा राजीनामा

By admin | Updated: February 26, 2017 00:44 IST

नेतृत्वावर टीका; गटबाजी, व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा आरोप

विटा : कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी शनिवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. मागील वर्षभरात कॉँग्रेसच्या सर्वच नेत्यांना जिल्ह्यातील पक्षांतर्गत गटबाजी संपविण्यात अपयश आले. त्यातच व्यक्तिकेंद्रित राजकारण, गटबाजी आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी झाल्याने त्याचा दृश्य परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत झाल्याचे त्यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.सदाशिवराव पाटील आणि जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम गटात गेल्या काही वर्षांपासून धुसफूस सुरू आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी करीत उमेदवार उतरविले होते. शिवाय काँग्रेसचे ‘ए बी’ फॉर्म नाकारले होते. एवढेच नव्हे, तर जिल्हा परिषदेच्या भाळवणी गटातून काँग्रेसच्या एकमेव अधिकृत उमेदवाराविरुद्धही उमेदवार उभा केला होता. मात्र, खानापूर आणि आटपाडी तालुक्यांमध्ये पक्षाची एकही जागा निवडून येऊ शकली नाही. शनिवारी त्यांनी प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यात व जिल्ह्यात पक्षाची कामगिरी समाधानकारक झाली नाही. मागील वर्षभरात सर्वच नेत्यांना जिल्ह्यातील पक्षांतर्गत गटबाजी संपविण्यात अपयश आले आहे व नजीकच्या काळात यात फारसा फरक होईल, असे वाटत नसल्याचे पाटील यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.पक्षातील अंतर्गत गटबाजी, व्यक्तिकेंद्रित राजकारण व प्रामाणिक कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी आणि याचा दृश्य परिणाम म्हणून निवडणुकीत पक्षाची सुमार कामगिरी झाली. याची जबाबदारी स्वीकारून प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दत्तोपंत चोथे यांचाही राजीनामासदाशिवराव पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच कॉँग्रेसचे विटा शहराध्यक्ष दत्तोपंत चोथे यांनीही प्रदेशाध्यक्षांकडे पदाचा राजीनामा पाठविला आहे. माजी आ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विटा शहरात कॉँग्रेसचे काम करीत असून, जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे. शिवाय गटबाजी आणि व्यक्तिकेंद्रित राजकारण होत असल्याने त्याला कंटाळून कॉँग्रेसच्या विटा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे चोथे यांनी सांगितले.