शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सदाशिवराव-पडळकर आज एका व्यासपीठावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:18 IST

दिलीप मोहिते । लोकमत न्यूज नेटवर्क विटा : खानापूर मतदारसंघातील कॉँग्रेसचे माजी आ. सदाशिवराव पाटील, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव ...

दिलीप मोहिते ।लोकमत न्यूज नेटवर्कविटा : खानापूर मतदारसंघातील कॉँग्रेसचे माजी आ. सदाशिवराव पाटील, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर आणि आटपाडीतील भाजपचे नेते माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख हे आज सोमवारी साळशिंगे (ता. खानापूर) येथील कार्यक्रमासाठी एकाच व्यासपीठावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर खानापूरचे विद्यमान आ. अनिल बाबर यांच्या विरोधकांची एकत्रित गळाभेट होत असल्याने खानापूर मतदारसंघात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.साळशिंगे येथे सोमवार, दि. ८ रोजी माजी आ. सदाशिवराव पाटील व उद्योजक आनंदरावशेठ देवकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुलांना शालेय साहित्य व शैक्षणिक टॅबचे वाटप भाजप नेते माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख व वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांच्याहस्ते होत आहे. या कार्यक्रमासाठी आटपाडीतील हे दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याने चर्चेला उधाण आले आहे.माजी आ. सदाशिवराव पाटील व वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांची विट्यात गेल्या आठवड्यात बंद खोलीत तासभर चर्चा झाली. त्या चर्चेची माहिती गोपनीय ठेवण्यात आली. परंतु, सोमवारी साळशिंगे येथे माजी आ. सदाशिवराव पाटील यांचे खंदे समर्थक असलेले उद्योजक आनंदराव देवकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास पडळकर व राजेंद्रअण्णांची उपस्थिती हा सध्या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. बाबर यांचे विरोधक समजले जाणाऱ्या या तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांची सोमवारी एकाच व्यासपीठावर होणारी गळाभेट मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार आहे, यात शंका नाही.