शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
5
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
6
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
7
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
8
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
9
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
13
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
14
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
15
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
16
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
17
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
18
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
19
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
20
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

सदाभाऊ विश्वासात घेत नाहीत!

By admin | Updated: June 21, 2016 01:22 IST

अशोकराव गायकवाड : विट्यातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात टीका

विटा : गटा-तटाच्या व जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे कॉँग्रेसचे नुकसान झाले असून, येथे दहा वर्षे कॉँग्रेसचे आमदार असतानाही खानापूर पंचायत समिती कॉँग्रेसच्या ताब्यात कधी आली नाही. माजी आमदार सदाभाऊ पाटील कोणालाही विश्वासात घेत नाहीत. नेत्यांनी कार्यकर्त्यांना ताकद द्यावी लागते, परंतु ते ही ताकद स्वत:साठी वापरत आहेत, अशी टीका अशोकराव गायकवाड यांनी प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्यावर केली.येथे खानापूर तालुका व विटा शहर कॉँग्रेसच्यावतीने सोमवारी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम होते. यावेळी माजी आ. सदाशिवराव पाटील, माजी आ. हाफिज धत्तुरे, सत्यजित देशमुख, रामरावदादा पाटील, शैलजा पाटील, सौ. मालन मोहिते, आनंदराव मोहिते, जि. प. सदस्य सुहास शिंदे, सुरेश मोहिते, पृथ्वीराज पाटील, शशिकांत देठे, प्रतापराव साळुंखे, रवींद्र देशमुख, दत्तोपंत चोथे उपस्थित होते.गायकवाड यांच्या टीकेवर सदाशिवराव पाटील म्हणाले की, कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षपातळीवर एकसंध राहिले पाहिजे. पाठीमागे झालेल्या चुकांचा आता ऊहापोह करू नका. त्यावर आता बोळा फिरवा. आगामी निवडणुकांत कार्यकर्त्यांनी वेगळी ताकद दाखविण्याची भूमिका न घेता पक्ष सांगेल तेच ऐकले पाहिजे. समन्वय व रूजवातीचे राजकारण केल्यास निश्चित यश मिळेल. त्यासाठी पक्ष व नेतृत्व करणाऱ्यांशी सर्वांनी एकत्रित आणि प्रामाणिक रहावे.ते म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती व आमदारकी नसल्यामुळे कार्यकर्त्यांचे काय हाल होतात, हे आता सर्वांना समजले आहे. त्यामुळे यापुढील काळात सर्वांनी कोणाकडे संशयाने पाहू नका. हाताच्या चिन्हावर निवडणूक लढवेल तोच आपला पक्षाचा उमेदवार असेल, हे कोणीही विसरू नका. नेत्यांनीही कोणी काही सांगतो म्हणून न ऐकता रूजवातीची भूमिका घ्यावी. त्यामुळे आपापसातील गैरसमज दूर होतील.मोहनराव कदम म्हणाले की, गेल्या पाच वर्षापासून जिल्हा परिषद, पंचायत समित्यात आपले काम होत नाही. राग, व्देष सोडून तालुक्यात कोणावरही अन्याय होणार नाही, त्याची जबाबदारी प्रदेश कॉँग्रेस उपाध्यक्षांची आहे. मात्र कार्यकर्त्यांनीही प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीची चर्चा करू नका.विटा शहराध्यक्ष दत्तोपंत चोथे यांनी स्वागत, खानापूर तालुकाध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी प्रास्ताविक केले. या मेळाव्यास आप्पासाहेब शिंदे, वसंतराव गायकवाड, जयदीप भोसले, अजित ढोले, नंदकुमार पाटील, अशोक पवार, डॉ. नामदेव कस्तुरे, मनीषा शितोळे, मीनाक्षी पाटील, प्रतिभा चोथे, स्वाती भिंगारदेवे, जयकर कदम, उपनगराध्यक्ष अ‍ॅड. सचिन जाधव, भानुदास सूर्यवंशी, राजेंद्र माने, इंद्रजित साळुंखे, आनंदराव पाटील, किरण तारळेकर उपस्थित होते. (वार्ताहर)लोकप्रतिनिधी : मुख्यमंत्र्यांकडून बेदखलसदाशिवराव पाटील यांनी आ. अनिल बाबर यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, येथील लोकांचे (आ. बाबर) सरकारमध्ये फार काही चालते असे वाटत नाही. कारण मुख्यमंत्री आले, मात्र ते लोकप्रतिनिधींना बेदखल करून गेले. टेंभूच्या टप्पा भूमिपूजनला भाजपचे मंत्री आले, त्यांनी लोकप्रतिनिधींना साधे बोलाविलेही नाही. वलखडच्या टेंभू कालव्यावरील दरवाजाचे भूमिपूजन झाले, लोकप्रतिनिधींना निमंत्रणही दिले नाही. टेंभूची सर्व कार्यालये यवतमाळला स्थलांतरित झाली. लोकप्रतिनिधी गप्पच राहिले.