लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एस. टी. महामंडळाला तोटा झाल्याचे दाखवून छुप्या पद्धतीने खासगीकरणाचा डाव आखला जात आहे. हा डाव उधळून लावू, असा इशारा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला.
मिरज आगारातील वाहतूक नियंत्रक डी. डी. पटेल यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले की, एस. टी. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षविरहीत काम करणार आहोत. कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय व वेतनाबाबत लवकरच आंदोलन करू. महामंडळाच्या खासगीकरणासह मोक्याच्या जागा व मालमत्ता हडप करण्याचा डाव उधळून लावल्याशिवाय गप्प बसणार नाही.
यावेळी डी. पी बनसोडे, आसिफ मुल्ला, राजू खैरमोडे, नौशाद आंबेकरी, संजय यादव, हिंदुराव जाधव, एस. एस. गाेरे, एम. बी. नांगरे, एम. जी. बनसोडे, बी. बी. मोमीन, वैशाली कोरे, आशालता चांडोले, एस. व्ही. मिसाळ, पी. पी. खांडेकर, बी. बी. पाखरे, आर. बी. मनारे उपस्थित होते.