शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड, डॉ. आंबेडकरांच्या फलकावरुन वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 14:23 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेला फलक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मृलन पथकाने हटवल्याने सोमवारी (16 एप्रिल) सकाळी सांगलीतील आंबेडकरनगरमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला.

सांगली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेला फलक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मृलन पथकाने हटवल्याने सोमवारी (16 एप्रिल) सकाळी सांगलीतील आंबेडकरनगरमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी दोनशेहून अधिक जमावाने पालिकेवर हल्ला करुन प्रभाग समिती एकच्या कार्यालयाची तोडफोड केली. घोरपडे यांना बेदम मारहाणही केली. या घटनेच्या निषेधार्थ कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली. यानिमित्त आंबेडकरनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारे फलक लावण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे हे फलक जप्त करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील कार्यकर्त्यांनी विरोध केला. यातून त्यांचा घोरपडे यांच्याशी जोरदार वाद झाला. कार्यकर्त्यांनी एवढ्या रात्री का आला आहात? ही कारवाई करण्याची वेळ आहे का? असा जाब विचारला. त्यावेळी घोरपडे यांनी ‘मला आयुक्तांचे आदेश आहेत’, असे सांगितले. त्यानंतर घोरपडे यांनी फलक जप्त केला. पण कार्यकर्त्यांनी पुन्हा आंबेडकरांचा फलक लावला. त्यानंतर घोरपडे पुन्हा फलक जप्त करण्यासाठी गेल्याने तणाव निर्माण झाला. कार्यकर्त्यांनी घोरपडेंना पिटाळून लावले.

घोरपडे यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी आंबेडकरनगरमधील दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी महापालिकेकडे धाव घेतली. पालिकेतील प्रभाग समिती क्रमांक एकच्या कार्यालयावर हल्ला केला. तेथील खुर्चांची मोडतोड केली. खिडक्यांचा काचा फोडल्या. घोरपडे यांनी शोधून बेदम मारहाण केली. अनपेक्षित घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना बाहेर काढून पालिकेला कुलूप ठोकले. पालिकेला चारही बाजूने पोलिसांनी वेढा दिला आहे. दोनशेहून अधिक पोलीस तैनात केले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत बनली होती.  कर्मचारी आक्रमक अतिक्रमण निर्मृलन पथकाचे प्रमुख घोरपडे यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. हल्लेखोरांवर कारवाई करावी, अशी कर्मचा-यांनी मागणी केली. दरम्यान तोडफोड व घोरपडे यांना मारहाणप्रकरणी पालिका प्रशासनाच्यावतीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली जाणार आहे.