रोटरी क्लबतर्फे विविध व्यावसायिकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सत्यनारायण झंवर, प्रशांत बेदमुथा, मीना आपटे, धनश्री आपटे, प्रमोद पाटील, सुहास जोशी आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : रोटरी क्लबतर्फे विविध क्षेत्रांतील कर्तबगार व्यावसायिकांना रोटरी व्होकेशनल पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. व्यावसायिक मीना आपटे व धनश्री आपटे, पोस्टमन दिलीप खोत, वडापाव व्यावसायिक चंद्रकांत डिसले, बाळासाहेब डिसले, नाश्ता सेंटरचालक अनंत गराटे, क्रीडाशिक्षक अमेय पाटील, रसायन व्यावसायिक प्रवीण चौगुले व धान्य व्यापारी सिद्धू चित्तरगी यांचा सन्मान झाला. सत्यनारायण झंवर व प्रशांत बेदमुथा यांच्या हस्ते चांदीचे नाणे व सन्मानचिन्ह देण्यात आले. यावेळी सनतकुमार आरवाडे, मोहनीभाई देसाई, रविकिरण कुलकर्णी, उदय पाटील, प्रमोद चौगुले, अरुण दांडेकर, रामकृष्ण चितळे आदी उपस्थित होते. सत्कारमूर्तींच्या वतीने धनश्री आपटे व अमेय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. रोटरीचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी स्वागत केले. डॉ. सुहास जोशी यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन सचिन कौले यांनी केले.
-------