शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमभाऊंच्या भूमिकेने विरोधक कोंडीत

By admin | Updated: July 23, 2016 00:13 IST

इस्लामपूर पालिका निवडणूक : राष्ट्रवादीच्या बळकटीचा आलेख वाढतोय

अशोक पाटील-- इस्लामपूर   पालिकेची निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादीला शह देण्याचा विडा स्वाभिमानीच्या खासदार राजू शेट्टी, ना. सदाभाऊ खोत यांनी उचलला आहे. परंतु भाजप युवा मोर्चाचे विक्रमभाऊ पाटील हे भाजप झेंड्याखाली स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे विरोधकांना एकत्र करणाऱ्या नेत्याची मुस्कटदाबी होत चालली आहे. या विरोधकांच्या भूमिकेमुळे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या बळकटीचा आलेख वाढत आहे.गत पालिका निवडणुकीत विरोधकांची हवा चांगली होती. परंतु अंतिम टप्प्यात राष्ट्रवादीतील काही उमेदवारांनी विरोधी गटातील उमेदवारांशी अंतर्गत साटेलोटे केले, तर शिवसेनेचे आनंदराव पवार यांनी सवतासुभा मांडला. त्यामुळे विरोधकांतील मातब्बरांना चांगलाच धक्का बसला. यातून विरोधक सावरतील असा राजकीय अंदाज होता. परंतु विक्रमभाऊ पाटील, आनंदराव पवार, वैभव पवार, बाबा सूर्यवंशी आणि विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांच्यामधील अंतर्गत दरी रुंदावत गेली आहे. त्यामुळे सध्या ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ अशी अवस्था विरोधकांची झाली आहे. याचाच फायदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीला झाला आहे.गत निवडणुकीत विरोधकांना झटका बसूनही त्यांनी आत्मपरीक्षण तर केलेच नाही, उलट भाजपच्या झेंड्याखाली राहून नगरसेवक बाबा सूर्यवंशी आणि भाजप युवा मोर्चाचे विक्रमभाऊ पाटील यांनी वेगवेगळी ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. आजही या दोघांमधील दरी रुंदावलेलीच आहे. शिवसेनेचे नगरसेवक आनंदराव पवार आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक वैभव पवार हे दोघे एकदिलाने पवार आॅईल मिलसमोरील पिंपळाच्या झाडाच्या साक्षीने एकत्रित होते. परंतु अलीकडे या दोघांमध्येही मोठी दरी पडली आहे. या दोघांना एकत्र करण्यासाठी खा. राजू शेट्टी, ना. सदाभाऊ खोत आणि नानासाहेब महाडिक यांचे प्रयत्न दिसून येणार आहेत.एकूणच भाजप, शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे इस्लामपुरात शिरकाव केलेल्या महाडिक युवा शक्तीच्या राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांना आपली भूमिका आजही गुलदस्त्यात ठेवली आहे. विरोधकांच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे, एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादीच्या बळकटीचा आलेख वाढत आहे, हे मात्र निश्चित.विरोधकांना एकत्रित करण्याचा प्रयत्नइस्लामपूर नगरपरिषदेत माजी नगरसेवक एल. एन. शहा यांचा विरोधकांतील सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न नेहमीच असतो. ते कोणत्याही पक्षाशी निगडित नाहीत. पण सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधात प्रामाणिकपणे ते लढा देत असतात. त्यांना मानणाराही एक वर्ग आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत विरोधकांची ताकद एकत्र झाली नाही तरी, स्वत:च्या प्रभागातून निवडणुकीच्या मैदानात उतरून ते आपली ताकद दाखवू शकतात.शिवसेनाही ‘हम भी कुछ कम नही’च्या भूमिकेत सध्या विक्रमभाऊ पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, आनंदराव पवार आणि वैभव पवार या चौघा नेत्यांच्या भूमिका चारी दिशेला विभागल्या आहेत. बाबा सूर्यवंशी विरोधकांची मोट बांधण्यास राजी आहेत. परंतु विक्रमभाऊ पाटील मात्र भाजपच्या झेंड्याखाली निवडणूक लढविण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे आनंदराव पवार यांनीही ‘हम भी कुछ कम नही’ अशी भूमिका घेतली आहे.