शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

‘सह्याद्री’च्या निवडणुकीत कडेगावची भूमिका निर्णायक

By admin | Updated: March 13, 2015 23:57 IST

बाळासाहेब पाटील यांना आव्हान : लालासाहेब यादव यांच्याकडे विरोधकांचे नेतृत्व

रजाअली पीरजादे - शाळगाव :  कऱ्हाड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखाना राजकीय अड्डा बनल्याची टीका विरोधी पॅनेलचे नेते कडेपूरचे लालासाहेब यादव यांनी केली असून, सत्ताधारी आ. बाळासाहेब पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. सत्ताधाऱ्यांकडून कडेगाव तालुक्याला उमेदवारी देण्यात आलेली नाही. यादव यांच्याकडे विरोधकांनी नेतृत्व दिल्याने सह्याद्रीच्या फडात कडेगावची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत कदम बंधू काय भूमिका घेणार, यालाही मोठे महत्त्व आहे. सह्याद्री कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कडेगाव तालुक्याचा समावेश होतो. या तालुक्यातील कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते बबनराव ऊर्फ भाऊसाहेब यादव गेली अनेक वर्षे कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. यावेळी मात्र सत्ताधारी गटाने या तालुक्यातून कोणालाही संधी दिलेली नाही. दुसऱ्या बाजूला विरोधी पॅनेलचे नेते लालासाहेब यादव यांचे पुत्र जयदीप यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.सह्याद्री कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष पी. डी. पाटील यांना सर्वप्रथम लालासाहेब यादव यांनी विरोध केला. तेव्हापासून आजअखेर यादव आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. विरोधकांच्या पॅनेलला ज्येष्ठ नेते आ. विलासराव पाटील-उंडाळकरांचा पाठिंबा मिळाला आहे, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दक्षिण कऱ्हाडमधील गट शांत आहे. उंडाळकर यांना मानणारे कऱ्हाड पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठल जाधव, मसूरचे वसंतराव जगदाळे यांची उमेदवारी विरोधी गटातून आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे. दुसरीकडे विरोधक बेरजेचे राजकारण करत आहेत. कऱ्हाड उत्तरमधून आ. पाटील यांना विधानसभा निवडणुकीत थेट आव्हान देणारे कॉँग्रेसचे नेते धैर्यशील कदम व मनोज घोरपडे विरोधी पॅनेलबरोबर आहेत.खटाव तालुक्यातून धैर्यशील कदम व साताऱ्यामधून घोरपडे यांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. कडेगावमधून जयदीप यादव उमेदवार आहेत. त्यामुळे आजची परिस्थिती पाहता विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असल्याचे चित्र आहे. मागील दोन निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. त्यावेळी राजकीय परिस्थिती वेगळी होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. असे असले तरी सध्याची साखर कारखानदारी राष्ट्रवादीच्या हातातच रहावी म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार प्रयत्नशील आहेत. या निवडणुकीत ते अप्रत्यक्ष भाग घेतील, यात कुणालाही शंका नाही. पवार कऱ्हाड दौऱ्यावर येणार असून, त्यावेळी या निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कॉँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये समझोता एक्स्प्रेस धावण्याची शक्यता आहे. तसे झाले तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम हे काय भूमिका घेणार, याला विशेष महत्त्व राहणार आहे.कडेगाव तालुक्याने नेहमीच सत्ताधारी गटाला मदत केली आहे. परंतु प्रत्येकवेळी सत्ताधारी गटातून कडेगावचा उमेदवार असे. अनेक वर्षे सत्ताधारी गटाने कडेगावला उपाध्यक्षपद दिले आहे. परंतु यंदा कडेगावला डावलण्यात आले आहे. त्यामुळे यावेळचे चित्र बदलण्याची शक्यता असून, कडेगावची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पी. डी. पाटील साहेब कारखान्याचे अध्यक्ष असताना चित्र वेगळे होते. मागील दोन निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. आता मात्र सभासदांना बदल हवा आहे आणि यावेळी बदल झालेला दिसून येईल.- लालासाहेब यादव