शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सुमनताईची खिंंड रोहित पाटील लढविणार-निवडणूक ही मिशन २०१९ आणि व्हिजन २०२४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:09 IST

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच, राष्टवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या निवडणुकीची खिंड त्यांचे पुत्र रोहित पाटील लढविणार असल्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर रोहित पाटील यांचा सक्रिय

दत्ता पाटील ।तासगाव : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच, राष्टवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या निवडणुकीची खिंड त्यांचे पुत्र रोहित पाटील लढविणार असल्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर रोहित पाटील यांचा सक्रिय सहभाग वाढला आहे. २०२४ च्या विधानसभेसाठी रोहित पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे राष्टवादीची तासगाव-कवठेमहांकाळची निवडणूक ही मिशन २०१९ आणि व्हिजन २०२४ या दृष्टिकोनातून लढवली जाणार असल्याचे स्पष्ट आहे.

माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात राष्टÑवादीकडे त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सुमनताई पाटील यांनी पोटनिवडणूक लढवून आमदारकीची धुरा सांभाळली. मात्र याही निवडणुकीत सर्वमान्य उमेदवार म्हणून आमदार सुमनतार्इंशिवाय दुसरा पर्याय नाही.

सुमनताइंसाठी पोटनिवडणुकीची केवळ औपचारिकता होती. मात्र या निवडणुकीत भाजपच्या झेंड्याखाली खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी एकत्रित येत लढत देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ही निवडणूक आमदार पाटील यांच्यासाठी केवळ अस्तित्वाची ठरणार नसून, त्यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या भवितव्याचा फैसला करणारीही ठरणार आहे.

पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर झालेला आमदार, असा ठपका विरोधकांकडून सुमनतार्इंवर सातत्याने ठेवण्यात आला आहे. मात्र थेट चुलीपासून विधानसभेपर्यंचा प्रवास आणि मतदारांशी सातत्याने ठेवलेला जनसंपर्क यामुळे या सहानुभूतीचे रूपांतर व्होट बँकेत झाले आहे. साडेचार वर्षातील कामगिरीच्या भरवशावरच या निवडणुकीत भाजपविरोधात रिंगणात उतरावे लागणार आहे.

या निवडणुकीत सुमनताइंच्या प्रचाराची धुरा त्यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या खांद्यावर असणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर, काही दिवसांपासून रोहित पाटील यांनी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढविला आहे. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या वक्तृत्वशैलीसह, त्यांचे सर्वच गुण आत्मसात करीत जनमानसात लोकप्रियता मिळवली आहे. या निवडणुकीत सुमनताइंच्या प्रचाराची धुरा सांभाळून २०२४च्या विधानसभा निवडणुकीची मशागत करण्यासाठी राष्टÑवादीकडून आतापासूनच रोहित पाटील यांच्यासाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवीन समीकरणांची पायाभरणी ठरणारी ही निवडणूक राष्टÑवादीसाठी औत्सुक्याची ठरणार आहे.संपूर्ण राज्यभरात कुतूहलमाजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यात स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र रोहित पाटील यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. रोहित पाटील यांची वक्तृत्वशैली हुबेहूब आर. आर. पाटील यांच्यासारखी आहे. ज्युनिअर आर. आर. पाटील म्हणून चर्चेत येणारे रोहित पाटील आर. आर. पाटलांचा वारसा कसा सांभाळणार, याचे राज्यभर कुतूहल आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली