शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ योजनेतील पाण्याची पळवापळवी

By admin | Updated: March 21, 2016 00:42 IST

शेतकऱ्याविरुध्द पोलिसात तक्रार : संतोषवाडीकडे जाणारे पाणी अडविले; नियोजनातील गोंधळ

सदानंद औंधे --मिरज --उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे ‘म्हैसाळ’चे पाणी पळविण्याचे प्रकार वाढत आहेत. लिंगनूर शाखा कालव्यातून संतोषवाडीकडे जाणारे पाणी अडविल्याबद्दल गायकवाडवाडी येथील शेतकऱ्याविरूध्द ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. दोन दिवसापूर्वी कळंबी शाखा कालव्याचे पाणी अडविण्याचा प्रकार घडला. म्हैसाळ कालव्यातून पाच टप्प्यातून ४५ पंपांद्वारे पाणी उपसा करून मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात पाणी सोडण्यात आले आहे. पाणीपट्टी भरणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात येत आहे. मात्र पाण्याची गरज मोठी असल्याने कालवा अडविण्याचे, कालवा फोडण्याचे, पाण्याची दिशा वळविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.गेल्या आठवड्यात आरगजवळ कालव्यात जेसीबीने बांध घालून पाणी अडविण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे ‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांनी रात्री कालव्यावर पोलिसांची गस्त सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी लिंगनूर शाखा कालव्याचे गेट पळवून, संतोषवाडीकडे जाणारे पाणी अडविण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मनोज गायकवाड या शेतकऱ्याविरूध्द पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. कळंबी शाखा कालव्यावर पाणी अडवून ते वळविण्यात आले. पाणी वापराच्या नियोजनात बदलामुळे गोंधळ उडाला होता. पाणी अडविणाऱ्या व पळविणाऱ्यांविरूध्द कारवाई करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी सांगितले जत वंचितच : महिना झाला तरी पाणी नाही...आवर्तन सुरू होऊन एक महिना झाला तरी, अद्याप जत तालुक्यात पाणी सोडण्यात आलेले नाही. टंचाईची तीव्रता वाढत असल्याने जत तालुक्यात पाणी सोडावे, यासाठी मोठा दबाव आहे. मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यात पोटकालव्यातून वितरण सुरू ठेवून जत तालुक्यात पाणी पोहोचणे कठीण असल्याने, मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील वितरण बंद करावे लागणार आहे. येत्या चार दिवसात जत तालुक्यात पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. आजवरची सर्वात जास्त वसुलीयोजना कार्यान्वित झाल्यापासून आजअखेर जास्तीत जास्त पाणीपट्टी वसुली ६0 लाखांपर्यंत गेली होती. यंदा २ कोटी रुपये शेतकऱ्यांनी जमा केले आहेत. याशिवाय कारखान्यांनी ३ कोटी, असे एकूण ५ कोटी रुपये जमा झाले आहेत. अजूनही शेतकरी पैसे भरत आहेत. त्यामुळे आणखी दीड कोटी रुपये जमा होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे आवर्तन मेअखेरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. जत आणि सांगोल्याचे पैसे जमा झाल्यानंतर पुन्हा वसुलीचा आकडा वाढणार आहे. पाणीपट्टी न भरणाऱ्यांकडून दीडपट वसुली...म्हैसाळ योजना सुरू होण्यासाठी साखर कारखान्यांनी तीन कोटी रूपये भरले आहेत. मात्र आवर्तन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून आणखी दोन कोटी रूपये जमा झाले आहेत. पाणीपट्टी न भरणाऱ्या व मागणी न नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांकडून दीडपट आकारणी करण्यात येणार असल्याचे ‘म्हैसाळ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.