शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत आरटीओनी जप्त केलेल्या रिक्षा सडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 15:27 IST

वेगवेगळ्या कारवायांमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केलेल्या पाचशेहून अधिक रिक्षा दोन वर्षांहून अधिक काळ पडून आहेत. त्यातील निम्म्या रिक्षा महापुरात बुडाल्याने सडल्या आहेत, तर उर्वरित रिक्षा वापराअभावी गंजू लागल्या आहेत. यामुळे रिक्षा व्यावसायिकांची कोंडी झाली आहे.

ठळक मुद्देसांगलीत आरटीओनी जप्त केलेल्या रिक्षा सडल्यानियमभंगाच्या कारणांनी आरटीओतर्फे वेळोवेळी रिक्षा जप्त

सांगली : वेगवेगळ्या कारवायांमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केलेल्या पाचशेहून अधिक रिक्षा दोन वर्षांहून अधिक काळ पडून आहेत. त्यातील निम्म्या रिक्षा महापुरात बुडाल्याने सडल्या आहेत, तर उर्वरित रिक्षा वापराअभावी गंजू लागल्या आहेत. यामुळे रिक्षा व्यावसायिकांची कोंडी झाली आहे.रिक्षाचालक संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रिक्षा त्वरित सोडण्याची मागणी केली. सांगली-मिरजेत नियमभंगाच्या कारणांनी आरटीओतर्फे वेळोवेळी रिक्षा जप्त केल्या जातात. दंड ठोठावला जातो. दंड भरेपर्यंत त्या ताब्यात ठेवल्या जातात. त्या ठेवण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडे जागा नसल्याने एसटीच्या जागेत ठेवल्या जातात.

सांगलीत एसटी आगारात व मिरजेत चंदनवाडी कार्यशाळेच्या आवारात दोन वर्षांपासून पाचशेहून अधिक रिक्षा अशाप्रकारे पडून असल्याची माहिती रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महेश चौगुले यांनी दिली.वापराअभावी त्या गंजू लागल्या आहेत. इंजिने निकामी होताहेत. सांगलीत महापूर काळात एसटी आगारात चार फुटांहून अधिक पाणी साचले होते. त्यामध्ये रिक्षांची धूळदाण झाली. बॉडी, इंजिन, कोचिंगसह दिव्यांची वासलात लागली. रिक्षाचालकांना लाखोंचा फटका बसला. काही व्यावसायिकांनी दंड भरुन रिक्षा सोडविण्याचा प्रयत्न केला, पण एसटीने अडविले.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष महेश चौगुले, अरीफ शेख, सलीम मलीदवाले, नीलेश चव्हाण, मोहसीन पटवेगार, जावेद पटवेगार, संजय बन्ने, बाळू खतीब, बिरु ऐवळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीSangliसांगली