शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

म्हैैसाळ योजनेचे आवर्तन सुरू; पाणी जतला सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:58 IST

मिरज : म्हैसाळ योजना सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची रक्कम भरली नसल्याने ‘म्हैसाळ’चे पोटकालवे अद्याप बंदच आहेत. आरग येथील शेतकºयांनी ...

मिरज : म्हैसाळ योजना सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची रक्कम भरली नसल्याने ‘म्हैसाळ’चे पोटकालवे अद्याप बंदच आहेत. आरग येथील शेतकºयांनी खा. संजय पाटील यांची भेट घेऊन लक्ष्मीवाडी पोटकालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली. म्हैसाळच्या पाचव्या टप्प्यातून जतला पाणी सोडण्यात आले आहे.अपुºया पावसामुळे पाणीटंचाई जाणवू लागल्याने म्हैसाळ योजनेच्या पाण्यावर बागायती क्षेत्र अवलंबून असलेले शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत होते. सप्टेंबर महिन्यात ताकारी, टेंभू व म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यात आले. खंडित वीजपुरवठा सुरू झाल्यानंतरही म्हैसाळ योजनेच्या २० हजार हेक्टर लाभक्षेत्रातील शेतकºयांनी पाण्याची मागणी नोंदविण्याच्या प्रतीक्षेत आवर्तन रखडले होते. पहिल्या टप्प्यातील १४, दुसºया टप्प्यात १७, तिसºया टप्प्यात १२, चौथ्या टप्प्यात १० व पाचव्या टप्प्यातील ५ पंपांद्वारे मुख्य कालव्यात पाणी सोडण्यात येत असून, सोमवारी पाणी जतपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. म्हैसाळच्या मुख्य कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. मात्र पाण्याची मागणी नोंदवून पैसे भरणाºया शेतकºयांसाठी डोंगरवाडी, गव्हाण व लिंगनूर पोटकालवे सुरू करण्यात आले आहेत. आरग ते लक्ष्मीवाडी पोटकालव्यात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आरगच्या शेतकºयांनी वारणाली येथे खा. संजय पाटील यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी व म्हैसाळच्या अधिकाºयांची बैठक घेऊन खा. संजय पाटील यांनी, शेतकºयांना पाणीपट्टीची रक्कम भरण्याचे आवाहन केले.दहा लाख भरले!डोंगरवाडी, गव्हाण व लिंगनूर पोटकालव्यांच्या क्षेत्रातील शेतकºयांनी सुमारे १० लाख रूपये पाणीपट्टी भरली आहे. प्रति १० हजार लिटर पाण्यासाठी केवळ ७ रूपये आकारणी करण्यात येत असल्याने शेतकºयांनी पाणीपट्टी भरल्यानंतरच पोटकालवे सुरू करण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी सांगितले.