शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

अग्रणी पाठोपाठ महांकाली नदीचे पुनरूज्जीवन करा: राजेंद्रसिंह राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 18:14 IST

नदीच्या पाण्याकडे केवळ पाणी म्हणून न पाहता, जलनीती आणि नदीशास्त्र समजून घेऊन पुनरूज्जीवनाचे उर्वरित काम पूर्ण करावे. अग्रणी नदीबरोबरच दुष्काळी जत तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महांकाली नदीच्या पुनरूज्जीवनाचा उपक्रमही हाती घ्यावा, असे आवाहन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

 

सांगली , दि.६ : नदीच्या पाण्याकडे केवळ पाणी म्हणून न पाहता, जलनीती आणि नदीशास्त्र समजून घेऊन पुनरूज्जीवनाचे उर्वरित काम पूर्ण करावे. अग्रणी नदीबरोबरच दुष्काळी जत तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महांकाली नदीच्या पुनरूज्जीवनाचा उपक्रमही हाती घ्यावा, असे आवाहन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी अग्रणी नदी पुनरूज्जीवन आढावा बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी वि. ना. काळम, कर्नाटकचे प्रशांत होन्नागोळ, अण्णासाहेब अडहळ्ळी, अ‍ॅड. संजय होनकांडे, सतीश अडहळ्ळी, रवी नागगूळ, धाराप्पा होन्नागोळ, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी उपस्थित होते.

राणा म्हणाले, महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना ही खूप चांगली योजना आहे. ती शास्त्रीय पद्धतीने राबविण्यावर राज्य शासनाचा भर आहे. या योजनेचे फलित सर्वांसाठी उपयोगी ठरणार आहे. ही योजना शास्त्रीय पद्धतीने राबविण्यासाठी जनसहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही योजना शासनाची नव्हे, तर आपली सर्वांची आहे, असे मानून यामध्ये सर्वांनी योगदान द्यावे.

कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी, सहाय्यक वनसंरक्षक सागर गवते, संपतराव पवार, जलबिरादरीचे नरेंद्र चुघ, विनोद बोधनकर, उदय गायकवाड, विलास चौथाई, श्रीपाद करंदीकर, कर्नाटकचे अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.

अग्रणीचे उर्वरित काम तातडीने करू : जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान आणि अग्रणी नदी पुनरूज्जीवन यांची कार्यपद्धती जलनीतीनुसार अनुसरून अग्रणी नदी प्रवाहित करण्यासाठी समन्वयाचा अभाव भरून काढून अपूर्ण कामे तात्काळ मार्गी लावू.

अग्रणी नदी पुनरूज्जीवन हे देशातील बेस्ट मॉडेल बनण्यासाठी प्रयत्न करू. तसेच, याकामी वाल्मी संस्थेची मदत घेऊ. जलसाक्षरतेसाठी यशदा संस्थेमध्ये कार्यशाळा घेऊ. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निवड झालेल्या १४० गावांतील प्रत्येकी ५ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.