शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत पूरस्थिती उपाययोजनांचा आढावा, अधिकाऱ्यांनी सतर्कता व समन्वय ठेवावा : काळम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 18:29 IST

सांगली जिल्ह्यात 2005 प्रमाणे पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अधिकाऱ्यांनी सतर्कता ठेवावी. तसेच, सांगली पाटबंधारे विभागाने कोयना धरण व आलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांशी सुसंवाद व समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे दिल्या.

ठळक मुद्देसांगलीत पूरस्थिती उपाययोजनांचा आढावाअधिकाऱ्यांनी सतर्कता व समन्वय ठेवावा : काळमपावसाळापूर्व आंतरराज्यीय समन्वय समिती बैठक

सांगली : सांगली जिल्ह्यात 2005 प्रमाणे पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अधिकाऱ्यांनी सतर्कता ठेवावी. तसेच, सांगली पाटबंधारे विभागाने कोयना धरण व आलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांशी सुसंवाद व समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पावसाळापूर्व आंतरराज्यीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी यावेळी आलमट्टी धरणाचे मुख्य अभियंता एस. एच. मुंजाप्पा, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. बी. पाटील, सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन. एस. करे, कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता एस. ए. मोने, बागलकोटचे उपायुक्त मारूती, आलमट्टी धरणाचे कार्यकारी अभियंता एम. एस. इनामदार, चिकोडीचे तहसीलदार सी. एस. कुलकर्णी, निपाणीचे तहसीलदार वाय. बी. नागथान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ आदि उपस्थित होते.सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोयना व आलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांशी दैनंदिन समन्वय व सुसंवाद ठेवून पाणीपातळी धोकापातळीच्या वर जावू नये, यासाठी वेळीच खबरदारी घ्यावी व आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे दिल्या.

पूरपरिस्थितीत बाधित होणाऱ्या गावांचा विचार करता पाटबंधारे, महसूल विभागाचे अधिकारी आणि आलमट्टी, कोयना धरणाच्या अधिकाऱ्यांनी दररोज परस्पर संपर्कात राहावे. आलमट्टी धरण, कोयना धरणांची पाणीपातळी तसेच सातारा, कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटकमधील पुलांच्या धोकादायक पातळीवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देऊन 2005 सारखी पूरपरिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अधिकाऱ्यांनी सर्वोत्तम कामगिरी बजावावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांनी सांगली पाटबंधारे विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी आलमट्टी धरण व कोयना धरणाच्या अधिकाऱ्यांनी धरणाची क्षमता, सद्यस्थितीतील पाणीपातळी, धोकापातळी यांची माहिती दिली.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Sangliसांगलीcollectorतहसीलदार