शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sangli- रेवणसिद्धाच्या खडी परिक्रमेस भाविकांची गर्दी, डोंगर गर्दीने फुलला 

By श्रीनिवास नागे | Updated: April 4, 2023 15:47 IST

विटा (जि. सांगली ) : महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणावी (ता. खानापूर) येथील तीर्थक्षेत्र श्री ...

विटा (जि. सांगली) : महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणावी (ता. खानापूर) येथील तीर्थक्षेत्र श्री रेवणसिद्धाच्या चैत्र महिन्यातील खडी परिक्रमेस भाविकांची गर्दी होत आहे. दररोज हजारो भाविक हजेरी लावत आहे.रेणावी येथे प्रतिवर्षीप्रमाणे चैत्र महिन्यात ३० दिवस खडी परिक्रमा घालण्याची परंपरा आहे. कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडल्यानंतर मागील वर्षीपासून भाविकांचा खडी परिक्रमा या प्रथेला प्रतिसाद मिळत आहे.श्री रेवणसिद्ध येथे सुमारे दोन किलोमीटर अंतर असणारी मंदिराभोवतीची प्रदक्षिणा म्हणजे खडी. रेवणसिद्धांचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर आल्यावर ईशान्य दिशेला असणाऱ्या मंदिराला वळसा घालून डाव्या बाजूच्या पायवाटेने चालत डोंगर पायथ्याभोवतालच्या परिसराला प्रदक्षिणा घातली जाते. पायात चप्पल न घालता साधारण अडीच किलोमीटर अंतराची प्रदक्षिणा न थांबता, खाली न वाकता, एकही शब्द न बोलता, मागे न पाहता पूर्ण केली तर ती एक खडी झाली, असे मानले जाते.खडी परिक्रमा भल्या सकाळी, पहाटे घातली जाते. यावेळी शुद्ध हवा व शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत असतो. त्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती राहण्यास मदत होते. खडीमुळे सृजनशील जीवन जगण्याचा संदेश मिळतो. अडीच किलोमीटर अंतर चालल्यामुळे व्यायामाचे महत्त्वही कळते.विविध स्तरातील आबालबुद्ध, स्त्री-पुरुष कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त १०१ खडी परिक्रमा पूर्ण करतात. गुढीपाडवा ते चैत्र अमावस्या यादरम्यान तीस दिवस खडी घातली जाते. खडी घालण्याचा समारोप करताना जमेल तसा शिधा आणि नारळ, दक्षिणा देवाला अर्पण केले जाते. काहीजण रोज तर काहीजण आठवड्यातून एकदा इच्छेनुसार खडी घालतात. एकावेळी एक ते काही भक्त सात-आठ खडी परिक्रमा पूर्ण करतात.चैत्र महिन्यात सकाळी साडेसात वाजता देवाची आरती झाल्यानंतर दररोज महाप्रसाद दिला जातो. श्रध्दा आणि जीवनावश्यक शिकवण देणाऱ्या खडी परिक्रमा प्रथेला प्रतिसाद मिळत आहे. भाविकांची गर्दी होत आहे.

नवस फेडण्यासाठी घातली जाते खडी

खडी परिक्रमा ही धार्मिक प्रथा अनेक वर्षापासून चालत आली आहे. मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा योजलेले काम पूर्ण झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी खडी घातली जाते, असे श्री रेवणसिद्ध देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगली