लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत सुभेदार पाेपट कृष्णा शिंदे हे नुकतेच निवृत्त झाले. ते शिराळा येथे आल्यावर ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात काेराेना नियमांचे पालन करत एसटी स्टॅण्ड ते त्यांच्या राहत्या घरापर्यंत मिरवणूक काढून त्यांचा सत्कार केला.
पाेपट शिंदे हे गेली २८ वर्षांपासून भारतीय सैन्य दलात कार्यरत हाेते. त्यांनी जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब, हैदराबाद, सिकंदराबाद आदी ठिकाणी त्यांनी भारतमातेची सेवा केली आहे. त्यांनी कारगिल युद्धात सहभाग घेऊन पाकिस्तानी सैनिकांना धूळ चारली हाेती. पाेपट शिंदे हे मूळचे शिराळा तालुक्यातील मांगरूळ येथील शिंदेवाडीचे रविवासी आहेत. त्यांचे वडील कृष्णा शिंदे यांनीही भारतीय सैन्य दलात उल्लेखनीय काम करून गावचा नावलाैकिक केला आहे.
यावेळी रेस्क्यू फोर्सचे संस्थापक आर.एस. पाटील, माजी मुख्याध्यापक शंकर पाटील यांनी मनाेगत व्यक्त केले. नीलेश भाकरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. महेश पाटील यांनी आभार मानले. यावेळी माजी सैनिक विलास शिंदे, विलास नापते, पंडित पाटील, तसेच रेस्क्यू फोर्सचे जवान, तसेच शिराळा व मांगरूळ येथील ग्रामस्थ उपस्थित होते.