राज्य सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या आठवडाअखेरच्या लॉकडाऊनला म्हणजेच वीकेण्ड लॉकडाऊनला कडेगाव तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळाला.
प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड आणि तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद
नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय
घराबाहेर पडणे टाळले.
लॉकडाऊनच्या काळात नियमांचे पालन व्हावे, यासाठी कडेगावचे पोलीस
निरीक्षक पांडुरंग भोपळे आणि चिंचणीचे पोलीस निरीक्षक
संतोष गोसावी यांनी जागोजागी
पोलीस पथक तैनात करून
बाहेर दिसणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना
बाहेर पडण्याचे कारण विचारून
योग्य ती कार्यवाही केली. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत असून, वाहनांची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
शुक्रवारी रात्रीपासून लॉकडाऊनला सुरुवात झाली. एकंदरीत
तालुक्यात वीकेण्ड लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.
कडेगाव शहरासह कडेपूर, वांगी, देवराष्ट्रे, चिंचणी, शाळगाव,
नेवरी, हिंगणगाव खुर्दसह
तालुक्यात सर्वत्र शुकशुकाट होता.
फोटो : १० कडेगाव १
ओळ :
कडेगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत
व्यावसायिकांनी लॉकडाऊनला प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली आहेत.