इस्लामपूर : वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर प्रत्येक नागरिकाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. इस्लामपूर नगरपालिकेच्या नो व्हेईकल डे उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे व प्रदूषण कमी करण्यास योगदान द्यावे, असे आवाहन राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी केले.पर्यावरणाचा वाढता ऱ्हास व इंधन बचत यांचा विचार करुन इस्लामपूर नगरपालिकेने आयोजित केलेल्या, आठवड्यातील एक दिवस ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दर मंगळवारी हा दिवस पाळला जाणार आहे. सकाळी ९ वाजता वाळवा पंचायत समितीपासून नगरपालिकेपर्यंत सायकल रॅली व पदयात्रा काढून पालिका प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी, नागरिकांनीही यात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी प्रा. पाटील बोलत होते.सांगलीहून सकाळी सहा वाजता सायकलवरून निघून इस्लामपुरात रॅलीत सहभागी झालेले गोविंदराव परांजपे, ८५ वर्षे वयाचे शामराव कोळी, वीरेंद्र राजमाने, विश्वासराव पाटील, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनीही रॅलीत सहभाग घेतला. शहर राष्ट्रवादीच्यावतीने अध्यक्ष शहाजी पाटील यांनी सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.मुख्याधिकारी नीलेश देशमुख म्हणाले, नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात इस्लामपूर नगरपालिका नेहमीच आघाडीवर आहे. शहरातील नागरिकांनी देखील या उपक्रमात सहभागी व्हावे. पंचायत समिती, शिराळा नाका, गांधी चौक, यल्लम्मा चौक ते नगरपालिका अशी रॅली निघाली. यावेळी इंजिनिअर्स असोसिएशनचे अनिल पाटील, डॉ. अमृत पाटील, संजय कबुरे, नगरसेवक शहाजी पाटील, महाडिक युवा शक्तीचे सोमनाथ फल्ले, माजी नगरसेवक आयुब हवलदार, भूषण कारंजकर, नारायण पाटोळे, आनंदा कांबळे, आर. आर. खांबे, एस. एम. कांबळे, साहेबराव जाधव, प्रकाश सवाईराम यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)इस्लामपूर पालिकेच्या ‘नो व्हेईकल डे’ला प्रतिसादप्रत्येक मंगळवारचा संकल्प : नगरपालिकेकडून नागरिकांना सहभागासाठी आवाहनइस्लामपूर : वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर प्रत्येक नागरिकाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. इस्लामपूर नगरपालिकेच्या नो व्हेईकल डे उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे व प्रदूषण कमी करण्यास योगदान द्यावे, असे आवाहन राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी केले.पर्यावरणाचा वाढता ऱ्हास व इंधन बचत यांचा विचार करुन इस्लामपूर नगरपालिकेने आयोजित केलेल्या, आठवड्यातील एक दिवस ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दर मंगळवारी हा दिवस पाळला जाणार आहे. सकाळी ९ वाजता वाळवा पंचायत समितीपासून नगरपालिकेपर्यंत सायकल रॅली व पदयात्रा काढून पालिका प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी, नागरिकांनीही यात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी प्रा. पाटील बोलत होते.सांगलीहून सकाळी सहा वाजता सायकलवरून निघून इस्लामपुरात रॅलीत सहभागी झालेले गोविंदराव परांजपे, ८५ वर्षे वयाचे शामराव कोळी, वीरेंद्र राजमाने, विश्वासराव पाटील, मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनीही रॅलीत सहभाग घेतला. शहर राष्ट्रवादीच्यावतीने अध्यक्ष शहाजी पाटील यांनी सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.मुख्याधिकारी नीलेश देशमुख म्हणाले, नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात इस्लामपूर नगरपालिका नेहमीच आघाडीवर आहे. शहरातील नागरिकांनी देखील या उपक्रमात सहभागी व्हावे. पंचायत समिती, शिराळा नाका, गांधी चौक, यल्लम्मा चौक ते नगरपालिका अशी रॅली निघाली. यावेळी इंजिनिअर्स असोसिएशनचे अनिल पाटील, डॉ. अमृत पाटील, संजय कबुरे, नगरसेवक शहाजी पाटील, महाडिक युवा शक्तीचे सोमनाथ फल्ले, माजी नगरसेवक आयुब हवलदार, भूषण कारंजकर, नारायण पाटोळे, आनंदा कांबळे, आर. आर. खांबे, एस. एम. कांबळे, साहेबराव जाधव, प्रकाश सवाईराम यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
इस्लामपूर पालिकेच्या ‘नो व्हेईकल डे’ला प्रतिसाद
By admin | Updated: April 23, 2015 00:12 IST