लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : तंदुरुस्त आणि आरोग्यपूर्ण भारताचा संकल्प प्रत्येक विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी करावा. विद्यार्थ्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात धावणे आणि खेळ यासारख्या तंदुरुस्ती राखणाऱ्या फिटनेस उपक्रमास सहभागी व्हावे, असे आवाहन खानापूर पंचायत समितीचे सभापती महावीर शिंदे यांनी केले.
पाडळी (ता. तासगाव) येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यानगर येथील संकुलात ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ या उपक्रमाचे उद्घाटन सभापती शिंदे व धामणीच्या सरपंच पुष्पा संजय मंडले यांच्याहस्ते करण्यात आले. या वेळी सभापती शिंदे बोलत होते.
पै. अभिजित शिंदे यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील व्यायामाचे महत्व सांगितले. किरण पाटील यांनी फिट इंडिया फ्रीडम रन या उपक्रमाविषयी माहिती दिली.
यावेळी मुख्याध्यापक कुमार कांबळे, किरण पाटील, प्रवीण शिंदे, देवदास कुलकर्णी, संजय मंडले, जयश्री लवटे, सीमा गुरव, पूनम शिंदे, संभाजी गोसावी, सुमन गिरी उपस्थित होते. छाया शेंडगे यांनी आभार मानले.