शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

विरोध ही राष्ट्रवादीची भूमिका नाही

By admin | Updated: April 20, 2017 22:59 IST

संजय कोरे : इस्लामपूर शहराच्या विकासाबाबत सत्ताधारी बेफिकीर

इस्लामपूर : शहराच्या विकासाची गती कायम राहिली पाहिजे. शहराचा विकास करताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेहमीच सहकार्य राहील; मात्र आमच्या व्यवहार्य सूचनांचा स्वीकार न झाल्यास आमचा विरोध राहील. कायदेशीर अनियमितता आणि अवांतर खर्चाच्या विषयांना राष्ट्रवादीकडून विरोधच केला जाईल. विरोधासाठी विरोध ही आमची भूमिका असणार नाही, अशी माहिती पालिकेचे राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिली.येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात कोरे व त्यांच्या पालिकेतील सहकारी नगरसेवकांनी पत्रकारांशी संवाद साधला. १२ एप्रिल रोजी तब्बल १० तास चाललेल्या सर्वसाधारण सभेतील विविध विषयांवर दिलेल्या उपसूचना या विधायकपणे कामे व्हावीत, यासाठीच दिल्या गेल्या. विकासकामांना विरोध ही भूमिका नव्हती. कोरे म्हणाले, भुयारी गटर योजनेचे काम वेळेत आणि लवकर पूर्ण व्हावे, यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करणे तसेच उपभोक्ता कर आणि मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन या अटी शासनाकडून शिथिल करुन आणाव्यात, यासाठी दोन उपसूचना दिल्या. त्या दोन्हीही त्यांनी स्वीकारल्या नाहीत. आम्ही त्यांनी केलेला ठरावच मतदानाला टाकला असता, तर ठराव मंजूर झाला नसता. परिणामी योजना अडचणीत आली असती. त्यामुळे शहराच्या हिताचा विचार करुन आम्ही दोन पावले मागे घेतली.ते म्हणाले, १४ व्या वित्त आयोगातील विकासकामांच्या नियोजनाबाबत सत्ताधाऱ्यांची बेफिकीर वृत्ती समोर आली. त्यामुळे हा विषय त्यांना रद्द करावा लागला. मटण मार्केटच्या विषयाला आमचा विरोध नव्हता. किरकोळ खर्चासाठी १०-१२ लाख रुपये खर्च करण्यापेक्षा नवीन बांधकाम करावे, अशी उपसूचना दिली. महसुली अनुदाने नियमितपणे येतात. सत्ताधाऱ्यांनी विशेष अनुदानातून एक रुपाया आणला असेल तर दाखवून द्यावे. शहरात पूर्वी मंजूर झालेलीच विकासकामे सुरु आहेत. यांच्या कारकीर्दीत एकही नवीन विकासकाम मंजूर झालेले नाही. यावेळी शहाजी पाटील, बी. ए. पाटील, विश्वास डांगे, डॉ. संग्राम पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, बशीर मुल्ला, जयश्री माळी, संगीता कांबळे, जयश्री पाटील, सुनीता सपकाळ उपस्थित होत्या. (वार्ताहर)