शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: समडोळी येथे खणीत मुक्काम ठोकलेल्या अजस्त्र मगरीची सुटका

By संतोष भिसे | Updated: April 20, 2024 18:36 IST

मगरीला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक अधिवासात मुक्त केले

सांगली : समडोळी (ता. मिरज) येथील खाणीतून गावात घुसलेल्या अजस्त्र मगरीला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. गेल्या अनेक दिवसांपासून ती खणीत मुक्कामाला होती.शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ती जनावरांच्या गोठ्याजवळ आली होती. याची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली. गावातील रेणुका मंदिर परिसराच्या मागे छप्परवजा गोठ्याबाहेर मगर बराच वेळ पडून होती. सतर्क ग्रामस्थांनी खटपट करुन तिला जेरबंद केले. डोळ्यांवर पोते टाकले. कासऱ्याने बांधले. त्यानंतर वन विभागाच्या ताब्यात दिले.उप वन संरक्षक नीता कट्टे, सहाय्यक वन संरक्षक अजित साजणे यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी मगरीला रात्रीच ताब्यात घेतले. कुपवाड येथील कार्यालयात आणले. शनिवारी सकाळी तालुका लघु पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद ढगे यांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले. सुमारे चार वर्षे वयाची ही पूर्ण वाढ झालेली मादी होती.ग्रामस्थांनी सांगितले की, समडोळी गावाजवळील जुन्या खाणीत ती बऱ्याच दिवसांपासून ठिय्या मारुन होती. ग्रामपंचायतीमार्फत खणीत भर टाकून ती भरून घेण्याचे काम सुरु होते. कचरा साफ केला जात होता. यामुळेच मगर खणीबाहेर पडून नागरी वस्तीत आली असावी. मगरीच्या बचाव मोहिमेत उपसरपंच पिंटू मसाले, वन क्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर, वनपाल तुषार भोरे, वनरक्षक सागर थोरवत आदी सहभागी झाले.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग