शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: रेठरे धरण येथील युवकाची बिबट्याच्या तावडीतून सुटका

By हणमंत पाटील | Updated: March 28, 2024 16:56 IST

मानाजी धुमाळ रेठरे धरण : जबड्यात कुत्र्याची शिकार व नजरेत हल्ला करण्याच्या तयारी या आवेशात असलेल्या बिबट्याचा थरार येथील ...

मानाजी धुमाळरेठरे धरण : जबड्यात कुत्र्याची शिकार व नजरेत हल्ला करण्याच्या तयारी या आवेशात असलेल्या बिबट्याचा थरार येथील विजय बाजीराव पाटील या युवकाने अनुभवला. घटनास्थळी डंपर आल्याने बिबट्याच्या तावडीतून त्याची सही सलामत सुटका झाली. 'काळ आला होता, पण वेळ आली' नव्हती, अशी थरारक घटना रेठरे धरण येथे सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. परंतु, दोन दिवसानंतर हा प्रकार उजेडात आला.रेठरे धरण तलावाच्या पूर्वेस माळरानावर शेतातील कामासाठी मशीन सुरू होती. त्यामुळे विजय पाटील हा युवक एकटाच तिथे झोपला होता. पहाटे तीन वाजता पावलांचा आवाज आल्याने त्याच्या दिशेने विजय याने बॅटरी दाखविली. यावेळी बिबट्याच्या तोंडात कुत्र्याची शिकार दिसली. पण बिबट्या युवकाच्या दिशेने येऊ लागला.त्यावेळी त्याने आरडाओरडा केला, परंतु जवळ कोणीच नव्हते, विजय देखील पुढे बिबट्याकडे पाहत पाठीमागे चालत असताना त्याच्या पायाला दगड लागून पाय रक्तबंबाळ झालेला त्याचवेळी जबड्यातील कुत्र्याला खाली टाकून देत, बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुमारे अर्धा तास हा थरार सुरू होता.

डंपर आल्याने वाचला जीव..त्यावेळी तेथे एक डंपर आला व त्याच्या उजेडात चालकाला बिबट्या व समोर युवक असल्याचे दिसल्यावर त्याने घाबरलेल्या विजयला डंपरच्या केबिनमध्ये घेतल्याने त्याची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली. 

टॅग्स :Sangliसांगलीleopardबिबट्या