शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अँबुलन्स चालकांनी जादा दराची आकारणी केल्यास तक्रार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 20:24 IST

Aambulance CoronaVirus Sangli : कोरोना बाधीत रूग्णांना उपचाराकरिता हॉस्पीटल पर्यंत पोहोचवणे व उपचारानंतर बरे झालेले रूग्ण घरी सोडण्याकरीता  अँबुलन्सचे चालक/मालक यांनी मंजुर भाडे दरापेक्षा जादा दराची आकरणी केल्यास, कंट्रोल रूमकडे 0233-2310555 या दूरध्वनीवर क्रमांकावर तक्रार दाखल करावी, असे आवाहन सांगली  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी केले आहे.

ठळक मुद्देअँबुलन्स चालकांनी जादा दराची आकारणी केल्यास तक्रार करा अँबुलन्स कंट्रोल रूमकडे तक्रार करा : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे

सांगली : कोरोना बाधीत रूग्णांना उपचाराकरिता हॉस्पीटल पर्यंत पोहोचवणे व उपचारानंतर बरे झालेले रूग्ण घरी सोडण्याकरीता  अँबुलन्सचे चालक/मालक यांनी मंजुर भाडे दरापेक्षा जादा दराची आकरणी केल्यास, कंट्रोल रूमकडे 0233-2310555 या दूरध्वनीवर क्रमांकावर तक्रार दाखल करावी, असे आवाहन सांगली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी केले आहे.

खाजगी मालकीच्या नोंदणी झालेल्या अँबुलन्स नागरीकांना माफक दरात व वेळेवर मिळाव्यात याकरीता जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे 12 एप्रिल 2021 पासून अँबुलन्स कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आली आहे.

अँबुलन्सचे चालक/मालक यांनी मंजुर भाडे दरापेक्षा जादा दराची आकरणी केल्यास, कंट्रोल रूमकडे 0233-2310555 या दूरध्वनीवर क्रमांकावर तक्रार दाखल करावी. तक्रारीत रूग्णाचे नाव, अँबुलन्सचा क्रमांक, कोठून कोठे असे प्रवास ठिकाण, प्रवासाचा दिनांक व वेळ इत्यादी नमुद करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी केले आहे.उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे 24 ७ 7 करीता अँबुलन्स कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली असून त्याचा दुरध्वनी क्रमांक 0233-2310555 आहे. या क्रमांकावर ज्या नागरिकांना खाजगी अँबुलन्सची आवश्यकता आहे, त्यांना संपर्क साधून अँबुलन्सचे बुकिंग करता येईल. अँबुलन्स बुकिंग केल्यानंतर संबंधित वाहन चालक / मालक यांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सांगली यांनी दि. 7 जुलै 2020 रोजीच्या बैठकीत पुढीलप्रमाणे मंजुर केलेल्या भाडेदराप्रमाणे भाडे अदा करावे.अँबुलन्स करीता मंजुर केलेले भाडेदर पुढीलप्रमाणे 

  • मारूती व्हॅनसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 550 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 11 रूपये.
  • टाटा सुमो / मारूती इको / मॅटेडोर सदृष्य वाहनांसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 700 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 14 रूपये.
  • टाटा 407/स्वराज माझदा / टेंपो ट्रॅव्हलर इत्यादी वाहनांसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 900 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 18 रूपये.
  • ALS/आय.सी.यु. वातानुकुलीत वाहनांसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 1200 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 24 रूपये आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTrafficवाहतूक कोंडीSangliसांगलीhospitalहॉस्पिटल