शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करा, तासगाव येथे सर्वपक्षीय मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 18:08 IST

सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करा, अशी मागणी करीत तासगाव येथे शुक्रवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, तसेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याच्या विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चास नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दाखवून पाठिंबा व्यक्त केला.

ठळक मुद्देसुधारित नागरिकत्व कायदा रद्द करातासगाव येथे सर्वपक्षीय मोर्चा

तासगाव : सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करा, अशी मागणी करीत तासगाव येथे शुक्रवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, तसेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याच्या विरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चास नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दाखवून पाठिंबा व्यक्त केला.डॉ. बाबूराव गुरव, फारूक गवंडी, तासगाव तालुका सुधार समितीचे अध्यक्ष संदेश भंडारे, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, जाफर मुजावर, अर्जुन थोरात यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात आमदार सुमनताई पाटील, काँग्रेसचे विशाल पाटील, श्रीमंत कोकाटे आदी सहभागी झाले होते.विटानाका चौक येथून मोर्चा सुरू झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून बुरुड गल्लीमार्गे, सिद्धेश्वर चौक, पोस्ट कार्यालयापासून सांगली नाक्यावरून मोर्चा तहसील कार्यालयावर आला.

यावेळी फारूक गवंडी, हाफिज सलमान साहब, बहुजन नेते भीमराव भंडारे, रवी साळुंखे, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे, डी. के. पाटील, संदेश भंडारे, अर्जुन थोरात, नाना वाघमारे यांचीही भाषणे झाली.काँग्रेसचे विशाल चंदुरकर, शिवसेनेचे अमोल काळे, अरुण खरमाटे, शेकापचे बाबूराव जाधव, पांडुरंग जाधव, एआयएमआयचे सलाउद्दीन मुरसल, सलीम शेख, सिद्धिक मुल्ला, इरफान सलाते, स्वाभिमानी संघटनेचे जोतिराम जाधव, संभाजी ब्रिगेडचे अमोल कदम, विशाल रेणुसे, बसपाचे शंकर माने, मुन्ना कोकणे, राष्ट्रवादीचे डी. के. पाटील, शरद शेळके, वंचित आघाडीचे शेखर पावसे, मातंग समाज संघटनेचे विनोद देवकुळे, संजीव देवकुळे, होलार समाजाचे प्रकाश कांबळे, भटक्या विमुक्तांचे संदीप चव्हाण, विजय जाधव, रवी चव्हाण व कार्यकर्त्यांनी नियोजन केले.

विविध संघटनांनी आंदोलनास पाठिंबा दिला. विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, महिला, ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती. सूत्रसंचालन ह्यसीपीएमह्णचे राजेंद्र वाटकर यांनी केले. डॉ. विवेक गुरव यांनी आभार मानले.

टॅग्स :Morchaमोर्चाSangliसांगलीtasgaon-kavathe-mahankal-acतासगाव-कवठेमहांकाळ