शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रारूप मतदार याद्यांची ५ जूनला प्रसिद्धी निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर : ३० जूनला याद्या अंतिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:21 IST

सांगली : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या २० प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्यांचा कार्यक्रम बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. प्रभाग निश्चिती,

सांगली : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या २० प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्यांचा कार्यक्रम बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. प्रभाग निश्चिती, त्यावरील आरक्षण जाहीर झाल्यापासून प्रभागाच्या मतदार याद्यांबाबतची सर्वच इच्छुक उमेदवारांची उत्कंठा अखेर संपुष्टात येणार आहे. प्रारूप मतदार याद्यांची ५ जून रोजी प्रसिद्धी केली जाणार असून त्यावरील हरकती व सुनावणी होऊन ३० जून रोजी मतदान केंद्रासह अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.

सांगली महापालिकेची मुदत १३ आॅगस्ट रोजी संपत आहे. त्यासाठी जुलै महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. यंदा चारसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका होणार आहेत. गेल्याच महिन्यात प्रशासनाने नवीन प्रभाग रचना व आरक्षण निश्चिती केले आहे. एकूण २० प्रभागातून ७८ नगरसेवक निवडून जाणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यास सुरूवात केली आहे. मतदार याद्यांच्या कार्यक्रमांकडेही इच्छुकांचे लक्ष लागले होते. बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने प्रारुप मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला.या निवडणुकीसाठी १ जानेवारी २०१८ हा अर्हता दिनांक धरून निवडणूक आयोगाने २१ मे २०१८ रोजी मतदार यादी अद्ययावत केलेली आहे. ही यादी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्राह्य धरली आहे. महापालिका प्रशासनाला १० जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध केलेली यादी प्रभागनिहाय विभाजन करण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्धीची मुदत ५ जून आहे. पुढे नागरिकांकडून यासंदर्भात हरकती-सूचना दाखल करण्यासाठी १४ जूनपर्यंत मुदत दिली आहे. त्यावर सुनावणी होऊन अंतिम मतदार याद्या २७ जूनपर्यंत निवडणूक आयोग शिक्कामोर्तब करेल. त्यानंतर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या मतदान केंद्रांवर प्रसिद्धीसाठी ३० जूनची मुदत दिली आहे.