बागणी : बागणी (ता. वाळवा) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात सुरू असलेल्या विलगीकरणं कक्षामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत झाली आहे. सध्या येथील दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती सरपंच संतोष घनवट यांनी दिली.
ते म्हणाले की, राजारामबापू सहकारी साखर कारखाना व ग्रामपंचायत प्रशासन यांच्यावतीने विलगीकरण कक्ष सुरू झाल्यामुळे अनेक रुग्णांना याचा लाभ झाला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यास मदत झाली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी व शासन नियम पाळावेत तरच आपला गाव कोरोना मुक्त होईल.
विलगीकरण कक्षातील कोरोनामुक्त दोन्ही रुग्णांना गुलाबपुष्प देऊन त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी सरपंच संतोष घनवट, उपसरपंच विष्णू किरतसिंग, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नाजमीन शिकलगार, ग्रामविकास अधिकारी नानासाहेब कारंडे, सदस्य अमर पाटील, कोतवाल रणजित भोई, शरद माळी उपस्थित होते.