शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा-शिराळ्यात ‘स्वाभिमानी’ची पुनर्बांधणी : शेतकरी नेत्यांमधील संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 23:52 IST

इस्लामपूर : राज्यातील शेतकरी चळवळीला पुन्हा धार आणण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी संपर्क वाढवला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यारुपाने

ठळक मुद्दे सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे नव्याचे नऊ दिवस

अशोक पाटील ।इस्लामपूर : राज्यातील शेतकरी चळवळीला पुन्हा धार आणण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी संपर्क वाढवला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यारुपाने गेलेली ताकद पुन्हा मिळविण्यासाठी शेट्टी यांनी वाळवा व शिराळा तालुक्यात संघटनेची पुनर्बांधणी सुरु केली आहे. याउलट घाईघाईने स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेची अवस्था नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे झाली आहे.हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा इस्लामपूर-शिराळा मतदार संघ केंद्रबिंदू आहे. गत निवडणुकीत आघाडी काँग्रेसकडून या मतदार संघाची धुरा आमदार जयंत पाटील यांच्यावर होती. आगामी निवडणुकीत राजू शेट्टी हे काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जयंत पाटील हे टेन्शन फ्री दिसत आहेत. त्यांनी शेट्टी यांच्या भूमिकेविषयी बोलणे टाळले आहे.शेट्टी यांनी आपला शत्रू भाजप (सदा) मानूनच आपली वाटचाल सुरु केली आहे. स्वाभिमानीतून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांची पुन्हा जुळवाजुळवही सुरु केली आहे. स्वगृही परतलेल्या सयाजी मोरे यांना शेट्टी यांनी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षपद दिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी संघटनेची स्थापना केली.पहिलीच सभा त्यांनी शेट्टी यांचा बालेकिल्ला असलेल्या हातकणंगले येथे, तर जयसिंगपूरमध्ये भव्य शेतकरी मेळावा घेऊन त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केले होते. प्रत्येक जिल्ह्यात कार्यकारिणी जाहीर केली. संघटनेचे नव्याचे नऊ दिवस झाले असतानाच खोत यांनी ‘मी भाजपचाच’ असे सांगून आपली खरी ताकद ही भाजप असल्याचेच अप्रत्यक्षपणे स्वत:हून स्पष्ट केले. 

रयत क्रांती संघटना राजकीय पक्ष नाही. समाजातील विविध घटकांची समस्या सोडविण्याचे काम ही संघटना करते. विधानपरिषदेसाठी सदाभाऊ खोत यांनी अर्ज करताना भाजपचा एबी फॉर्म भरला होता. त्याचा विपर्यास प्रसारमाध्यमांनी केला आहे.- सागर खोत, युवा ने ते,रयत क्रांती संघटना.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगली