शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कलावंत मानधन योजनेचे काम करण्यास उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा नकार; राज्यभरात मानधन रखडले

By संतोष भिसे | Updated: May 18, 2024 16:27 IST

'आहेत तीच कामे डोईजड'

सांगली : कलाकार मानधन योजनेचे कामकाज जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे सोपविण्यात आले आहे. मात्र ते स्वीकारण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. या वादात कलावंताना एप्रिल महिन्याचे मानधन मिळालेले नाही.राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व वृद्ध कलावंतांना मानधन सन्मान योजना शासनामार्फत राबविण्यात येते. लाभासाठी कलावंतांची अ, ब, क, ड अशी श्रेणी करण्यात आली आहे. त्यानुसार वेगवेगळे मानधन दिले जायचे. गेल्या मार्चमध्ये मंत्रिमंडळाने श्रेणीनुसार मानधनाची पद्धत  बंद करुन  सरसकट सर्व लाभार्थ्यांना ५००० रुपये देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय १ एप्रिलपासून अंमलात येईल असेही जाहीर करण्यात आले. ही योजना आजवर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविली जात होती. प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती असून सचिवपदी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी काम करीत होते. मंत्रिमंडळाच्या नव्या निर्णयानुसार सदस्य सचिवपदी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रस्ताव मंजुरीसाठी समितीच्या बैठकीचे नियोजन करणे, कागपत्रांची छाननी करणे, प्रक्रिया सुरळीत राबविणे अशी कामे सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी करायची आहेत.मात्र हे काम करण्यास उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघटनेने स्पष्ट नकार दिला आहे. याबाबत संघटनेने राज्यस्तरावरुन नकाराचे पत्र शासनाला दिले आहे. आमच्यावर यापूर्वीच कामाची मोठी जबाबदारी असल्याने कलावंत मानधनाचे काम नव्याने स्वीकारता येणार नसल्याचे म्हटले आहे. 

 आहेत तीच कामे डोईजडग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सध्या कामाचा मोठा बोजा आहे. ग्रामपंचायतींचे कामकाज सुरळीत चालवणे, पदाधिकारी व प्रशासन यांच्यात समन्वय राखणे, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्ताराधिकारी आदींविरोधातील तक्रारींची सुनावणी करणे, ग्रामपंचायतींची करवसुली वाढविणे यासह शासकीय योजनांची ग्रामपंचायत स्तरावर अंमलबजावणी करणे आदी कामे करावी लागतात. या कामातून डोके वर काढण्यास फुरसत नसताना नव्याने कलावंत मानधनाची योजना राबविणे शक्य नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

वादात मानधन रखडलेकलावंत मानधनवाढीचा निर्णय मार्च महिन्यात झाला, त्यावर १ एप्रिलपासून अंमलबजावणी अपेक्षित होती. पण नव्या निर्णयापासून राज्यभरात कलावंतांना मानधन मिळालेले नाही. साहित्यिक व कलावंतांच्या आधारकार्ड पडताळणीचे काम सुरु असल्याचे कारण अधिकारी सांगत आहेत. पण प्रत्यक्षात उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी योजना स्वीकारण्यास नकार दिल्यानेच मानधन रखडल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Sangliसांगली