वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामामधील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडी इत्यादी वाहनांना रिफ्लेक्टर पट्टी बसविण्याचा प्रारंभ मोटार वाहन निरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संदीप पाटील म्हणाले की, कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडी इत्यादी वाहनांना शासनाच्या परिपत्रकानुसार रिफ्लेक्टर पट्टी बसविण्यात येत आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाने आपल्या वाहनाची देखभाल दररोज करणे आवश्यक आहे. वाहनचालकांनी नशापान करून वाहन चालवू नये. वाहन चालविताना मोबाइलचा वापर टाळावा. वाहनचालकांनी शासकीय नियमापेक्षा जादा प्रमाणात उसाची वाहतूक करू नये. आपल्या वाहनाचा आरटीओ पासिंग नंबर शासकीय नियमानुसार व्यवस्थित दिसेल असा असावा.
याप्रसंगी कारखान्याचे शेती अधिकारी प्रशांत कणसे, उपशेती अधिकारी वैभव जाधव, केनयार्ड सुपरवायझर शिवाजीराव सूर्यवंशी, वाहन विभाग प्रमुख गणपत कदम, सुरक्षा अधिकारी राजाराम जाधव तसेच वाहन मालक विशाल साळवे, भीमराव बांगर, वाहन चालक-मालक व शेती केनयार्ड विभाग कर्मचारी उपस्थित होते.
फाेटाे : ०९ वांगी १