शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेच्या घरपट्टीची ४६ कोटीची वसूली-४२ मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 14:09 IST

महापालिकेच्या घरपट्टी विभागाने यंदा विक्रमी वसुली केली असून ४६ कोटी ११ लाख रुपयांचे उत्पन्न मार्चअखेरीपर्यंत या विभागातून जमा झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६ कोटी २७ लाख रुपयांची वाढ

ठळक मुद्दे गतवर्षीच्या तुलनेत सव्वा सहा कोटीची वाढ

सांगली : महापालिकेच्या घरपट्टी विभागाने यंदा विक्रमी वसुली केली असून ४६ कोटी ११ लाख रुपयांचे उत्पन्न मार्चअखेरीपर्यंत या विभागातून जमा झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६ कोटी २७ लाख रुपयांची वाढ झाली असून पुढील आर्थिक वर्षात ५५ कोटी वसुलीचे उद्दीष्ट निश्चित केल्याचे कर निर्धारक व संकलक नितीन शिंदे यांनी सांगितले. 

महापालिकेच्या घरपट्टी विभागाकडील थकबाकीचा आकडा ७४ कोटीच्या घरात गेला होता. त्यात वर्षानुवर्षे थकीत असलेली ३९ कोटी व चालू मागणी ३५ कोटीची होती. त्यापैकी ३१मार्चपर्यंत ४६ कोटी ११ लाख १० हजार ८४६ रुपयांची वसुली झाली. गतवर्षी मार्चएण्डपर्यंत ३९ कोटी ८४ लाख रुपयांची वसूली झाली होती. यंदा ६ कोटी २७ लाख रुपये जादा वसूल झाले. घरपट्टी विभागाकडील थकबाकी वसुलीसाठी आयुक्त रवींद्र खेबूडकर व महापौर संगीता खोत यांनी अनेक बैठका घेतल्या. घरपट्टी विभागाची जबाबदारी नोव्हेंबर महिन्यात नितीन शिंदे यांच्यावर  सोपविण्यात आली. त्यांना ५० कोटीच्या वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. उद्दीष्टपुर्तीसाठी गेल्या चार महिन्यापासून घरपट्टी विभागाचे वसुली पथक, वारंट अधिकारी, अधिक्षक परिश्रम घेत होते. 

गत आर्थिक वर्षात महापालिकेकडे १ लाख २७ हजार मालमत्तांची नोंद होती. त्यात यंदा ५५७७ मालमत्तांची नव्याने भर पडली. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात १२ कोटी ५ लाख रुपयांचे जादा भर पडली. पुढील आर्थिक वर्षात महापालिकेची कराची मागणी ७६ कोटीपर्यंत पोहोचणार आहे. तर घरपट्टी विभागाने ५५ कोटीचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून आतापासून वसुलीचे नियोजन हाती घेतले आहे. वसुलीच्या या कामात अधिक्षक राजू लोंढे, अंकुश जिणगे, गणी सय्यद, वॉरंट अधिकारी सुनील पाटील, दिलीप कोळेकर, शिवाजी शिंदे, जे. के. इनामदार, आरिफ मुल्ला यांच्यासह कर्मचाºयांनी परिश्रम घेतले. जूननंतर सीलची कारवाईयंदाच्या आर्थिक वर्षात सव्वा कोटी रुपयांच्या थकबाकीपोटी ४२ मालमत्ता सील करण्यात आल्या. मोबाईल टॉवरच्या अडीच कोटीच्या थकबाकीसाठी मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. जूननंतर प्रत्यक्षात कारवाईला सुरूवात होईल. याशिवाय धार्मिक स्थळे, शासकीय इमारतीकडील थकबाकी वसुलीवर भर देणार असल्याचे नितीन शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली