शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार संस्थांचे जयंतरावांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 15:32 IST

माणगंगा कारखाना, महांकाली कारखाना, शेतकरी विणकरी सूतगिरणी, प्रतिबिंब गारमेंट, डिवाईन फूडस् व विजयालक्ष्मी कॉटन मिल या संस्थांचा जिल्हा बॅँकेने थकबाकी वसुलीसाठी ताबा घेतला असून, त्यांचा लिलाव जाहीर केला आहे.

सांगली : कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीपोटी सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत लिलाव प्रक्रिया जाहीर केलेल्या सात संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांना कारवाई थांबविण्यासाठी साकडे घातले आहे. याप्रश्नी ६ मार्च रोजी मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे. दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत कारवाई थांबविणार नसल्याचे र्बंकेने स्पष्ट केले आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने कोट्यवधी रुपयांच्या वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. र्बंकेचा एनपीए गेल्या दोन वर्षात वाढला आहे. बँकेच्यावतीने साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संस्था, अन्य उद्योगांना देण्यात आलेली कर्जाची रक्कम सुमारे अकराशे कोटी रुपये एनपीएमध्ये गेले आहेत. बड्या थकबाकीदार संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, परंतु त्यांनी प्रतिसाद न दिल्याने सेक्युरिटायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.

बड्या तीस थकबाकीदारांपैकी सात संस्थांकडेच सुमारे ४५० कोटींवर थकबाकी आहे. यामध्ये माणगंगा साखर कारखाना, महांकाली साखर कारखाना, विजयालक्ष्मी गारमेंट, डिवाईन फूडस्, प्रतिबिंब गारमेट, शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी, रामानंद भारती सहकारी सूतगिरणी यासह गणपती संघ व अन्य काही संस्थांचा समावेश आहे. यातील सात संस्थांवर बॅँकेने सिक्युरिटायझेशन अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई केली आहे.

जिल्हा बॅँक प्रशासनामार्फत सध्या मार्चअखेर या बड्या थकबाकींची वसुली करण्यासाठी धावपळ सुरू आहे. अध्यक्ष दिलीपतात्या पाटील व संचालक मंडळाने वसुलीची व थकबाकीदारांवर कारवाईचे सर्व अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील यांना दिले आहे. त्यामुळे कारवाईतील संचालकांचा हस्तक्षेप टळला आहे. प्रशासनास पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आहे. त्यामुळेच प्रशासन कारवाईवर ठाम राहिले आहे. अशा परिस्थितीत ही कारवाई थांबविण्यात यावी म्हणून सात संस्थांच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी पालकमंत्री व जिल्हा बँकेच्या सत्ताधारी मंडळाचे नेते जयंत पाटील यांच्याकडे साकडे घातले आहे. याप्रश्नी चर्चा करण्यासाठी जयंत पाटील यांनी ६ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले आहे.

माणगंगा कारखाना, महांकाली कारखाना, शेतकरी विणकरी सूतगिरणी, प्रतिबिंब गारमेंट, डिवाईन फूडस् व विजयालक्ष्मी कॉटन मिल या संस्थांचा जिल्हा बॅँकेने थकबाकी वसुलीसाठी ताबा घेतला असून, त्यांचा लिलाव जाहीर केला आहे. ६ व १३ मार्चला हा लिलाव होणार आहे. त्यामुळे कारवाई थांबविण्यासाठी संस्थाचालकांची धडपड सुरू आहे.

टॅग्स :bankबँकJayant Patilजयंत पाटील