शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिसिंहांच्या जन्मघराची पुनर्बांधणी होणार

By admin | Updated: August 20, 2016 23:15 IST

चंद्रकांत पाटील : क्रांतिवीर पांडूमास्तरांच्या स्मारकाला १ कोटी ४१ लाख

शिरटे : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जन्मभूमीत त्यांच्या जन्मघराची पुनर्बांधणी करून स्मारक म्हणून जतन करू तसेच स्मारकाच्या आधुनिकीकरणाचा दुसरा टप्पा हाती घेत आहोत, अशी घोषणा महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केली. याचवेळी त्यांनी येडेनिपाणी येथील क्रांतिवीर पांडूमास्तर यांच्या स्मारकासाठी १ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केल्याचेही स्पष्ट केले.येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे ‘आझादी ७० याद करो कुर्बानी’ कार्यक्रमांतर्गत भाजपच्यावतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या वारसांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. शिवाजीराव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, कृष्णा बॅँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, नियोजन समितीचे सदस्य विक्रम पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रकांत पाटील म्हणाले की, क्रांतिसिंहांच्या स्मारकाकडे जाणारा रस्ता, तसेच ज्या शिक्षण संस्थेत ते अध्यक्ष होते, त्या शाळेची दुरुस्ती करू. विजेअभावी अंधारात असणाऱ्या क्रांतिसिंहांच्या स्मारकाच्या देखभाल, दुरुस्तीचा दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येईल. स्वातंत्र्य चळवळीतील येडेनिपाणीचे क्रांतिवीर पांडू मास्तर यांचेही स्मारक व्हावे, अशी बऱ्याच दिवसांची मागणी होती. जनमताचा आदर व स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान लक्षात ठेवून त्यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी १ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहोत.विक्रम पाटील म्हणाले की, क्रांतिसिंहांचे गाव विकासापासून वंचित राहिले आहे. त्यांचे वारसही बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहेत. त्यांना हातभार लावणे गरजेचे आहे. गावातील प्रमुख रस्ते व शाळेची दुरुस्ती व्हावी, क्रांतिसिंहांचे जन्मघर हे स्मारक म्हणून घोषित करावे. गोपाल पाटसुपे यांनी सूत्रसंचालन केले. रावसाहेब पाटील यांनी आभार मानले.यावेळी प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार कविता लष्करे, राजाराम गरुड, मकरंद देशपांडे, तालुकाध्यक्ष शंकर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गजानन फल्ले, शहराध्यक्ष सयाजी पवार, संजय पाटील, सयाजी जाधव, प्रशांत कुलकर्णी, अ‍ॅड. महेश पाटील, रमाकांत कुलकर्णी, मोहन वळसे, माणिक ढोबळे उपस्थित होते. (वार्ताहर)मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्याप्रतिसरकारच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या उरात धडकी भरविणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचा विचार करून त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी अ‍ॅड. महेश पाटील यांच्यासह क्रांतिसिंहांचे वारसदार बाबूराव पाटील यांनी केली.क्रांतिसिंह नाना पाटील यांचे वारस बाबूराव पाटील, हणमंत पाटील, शहाजी पाटील, सुबराव पाटील, पांडुरंग पाटील, आत्माराम पाटील, विलास पाटील, बापूराव पाटील, दिलीप पाटील, संपत पाटील, रामराव पाटील व जालिंदर देशमुख आदींचा चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.खासदार-आमदारांची पाठभाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा देतानाच ‘याद करो कुर्बानी’ हा उपक्रम जाहीर केला. पक्षीय पातळीवर या उपक्रमास मोठे महत्त्व देण्यात आले आहे. मात्र शनिवारी येडेमच्छिंद्र येथे झालेल्या कार्यक्रमास पक्षाचे आ. शिवाजीराव नाईक वगळता जिल्ह्यातील खासदार व इतर आमदारांनी पाठ फिरवली होती.